myBMC | WhatsApp Chatbot Launch Saam News Digital
लाईफस्टाईल

WhatsApp ChatBot: +918999228999 या नंबरवर 'Hi' पाठवा आणि मिळवा BMC चे 'हे' मोफत फायदे

WhatsApp ChatBot: या सुविधेमुळे बृहन्मुंबई महापालिकेच्या जवळपास ८० सुविधांची माहिती आपल्या व्हॉट्सअपवर मिळणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक, मुंबई

मुंबई: देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळख असलेली बृहन्मुंबई महानगरपालिका आता आपल्या विविध सुविधांच्या बाबतीत हायटेक होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ (Whatsapp Chatbot) सुविधेचे लोकार्पण केले आहे. या सुविधेमुळे बृहन्मुंबई महापालिकेच्या जवळपास ८० सुविधांची माहिती आपल्या व्हॉट्सअपवर (Whatsapp) मिळणार आहे. या सुविधेमुळे नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. (CM Uddhav Thackeray launches BMC's WhatsApp chatbot for various services)

हे देखील पहा -

मुंबईतील नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअपद्वारे +918999228999 या व्हॉट्सअप क्रमांकावर अनेक सुविधांची माहिती अत्यंत सहजपणे उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या सुविधेचे ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी वस्त्रोद्योग मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री असलम शेख, पर्यटन पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मुंबईतील सर्व लोकप्रतिनिधी आणि मनपा पदाधिकारी, तसेच महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे आणि व्हॉटस्ॲपचे संचालक (सार्वजनिक धोरणे) शिवनाथ ठुकराल इत्यादी मान्यवर व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे याप्रसंगी उपस्थित होते.

ही सेवा कशी मिळवाल?

सर्वप्रथम आपल्या फोनमध्ये +918999228999 हा फोन नबंर सेव्ह करा. त्यानंतर आपले व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट्स रिफ्रेश करा. नंतर ज्या नावाने नंबर सेव्ह केला आहे ते नाव सर्च करा. मग तुम्ही महापालिकेच्या व्हॉट्सअप चॅट बॉट अकाऊंटवर पोहोचाल. या अकाऊंवर गेल्यावर चॅटबॉक्समध्ये 'Hi' असा मेसेज पाठवा. लगेचच तुम्हाला भाषेचा पर्याय दिसेल तेव्हा मराठी किंवा इंग्रजी भाषा निवडा. त्यानंतर नागरिक, व्यवसाय, पर्यटन असे पर्याय दिसतील. या पर्यायांपैकी जी माहिती हवी असेल ते निवडा. त्यानंतर लगेचच तुम्हाला सर्व माहिती असलेली लिंक तुमच्या व्हॉट्सअपवर मिळेल. जवळपास ८० सुविधांंची माहिती यावर मिळणार आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VP Election : मोदींचा राहुल गांधींना मोठा झटका, इंडिया आघाडीची १५ मते फुटली, राजधानीत मोठ्या घडामोडी

Success Story: सरकारी नोकरी करत दिली UPSC; पाचव्या प्रयत्नात झाल्या IPS; मोहिता शर्मा यांचा प्रेरणादायी प्रवास

Pune : पुण्यात पुन्हा गोळीबाराचा थरार, रात्री ११ वाजता मावळ हादरलं, नेमकं काय घडलं?

Chhagan bhujbal : जीआरमध्ये मराठा जातीचा उल्लेख, निर्णय मागे घ्या; छगन भुजबळ आक्रमक

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT