आयुष्यात प्रेम एकदातरी प्रेम होतंच. एखादा मुलगा आपल्याला पसंत करतो की फक्त मैत्री करतोय, असा प्रश्न अनेक मुलींना पडतो. काही मुलं आपल्या भावना पटकन व्यक्त करत नाहीत. पण त्यांच्या वागण्यातून त्या सहज ओळखता येऊ शकतात. तो तुमच्याशी कसा बोलतो, तुमच्यासोबत वेळ कसा घालवतो आणि तुमच्या छोट्या गोष्टींकडे किती लक्ष देतो, यावरून त्याच्या मनात तुमच्याबद्दल खास भावना आहेत का, याचा अंदाज येऊ शकतो. जाणून घेऊया अशी ७ लक्षणं...
एखाद्या मुलाला तुम्ही आवडत असाल, तर तो तुमच्या आसपास राहण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला भेटण्यासाठी वेगवेगळी कारणं शोधतो. कुठे जायचं असेल तर सोबत येण्याची तयारी दाखवतो. त्याला तुमच्यासोबत वेळ घालवायचा आवडतं.
मुलगा सतत तुमच्याकडे पाहतो, तुम्ही समोर आल्यावर त्याच्या चेहऱ्यावर हसू येतं किंवा बोलताना तो तुमच्याकडे लक्ष देतो. तुमच्याशी संवाद साधताना त्याची देहबोली सकारात्मक असते. हे आकर्षणाचे संकेत असू शकतात.
तुमचा मेसेज आल्यावर तो शक्य तितक्या लवकर उत्तर देतो. एवढंच नाही, तर संभाषण पुढे सुरू ठेवण्याचाही प्रयत्न करतो. तुमच्याशी बोलण्यासाठी त्याला वेगळ्या कारणाची गरज भासत नाही.
तुम्हाला एखाद्या कामात मदत हवी असेल, तर तो स्वतःहून पुढे येतो. तुमची अडचण सोडवण्यासाठी वेळ देतो आणि तुमचा दिवस चांगला जावा यासाठी प्रयत्न करतो.
मित्रांच्या ग्रुपमध्ये असतानाही तो तुमच्याकडे विशेष लक्ष देतो. तुम्ही बोलताना काळजीपूर्वक ऐकतो. तुम्हाला काही अडचण आहे का, हेही जाणून घेण्याचा प्रयत्न करतो.
तुम्हाला काय आवडतं, काय आवडत नाही, याची तो काळजी घेतो. तुमच्यासोबत वेळ घालवण्यासाठी स्वत:च्या दिनक्रमात बदल करतो. नातं चांगलं राहावं यासाठी प्रयत्न करतो.
तुमची आवडती कॉफी, नवीन हेअरकट किंवा तुमच्या स्वभावातले छोटे बदल त्याच्या लक्षात येतात. तुम्ही उदास असाल, तर काही न सांगताही तो ते ओळखतो. यावरून त्याला तुमची किती काळजी आहे, हे समजू शकतं.
महत्त्वाचं: ही सात लक्षणं एखाद्याला तुमच्याबद्दल आकर्षण किंवा जिव्हाळा असल्याचे संकेत असू शकतात. मात्र, केवळ या गोष्टींवरून प्रेम असल्याचा निष्कर्ष काढू नका. त्याच्या वागण्यात सातत्य, आदर आणि प्रामाणिकपणा आहे का, हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.