Banana storage tips meta ai
लाईफस्टाईल

Banana Storage : केळी फ्रिजमध्ये ठेवू नका! अनेक दिवस ताजी ठेवायची असतील तर वापरा ही सोपी ट्रिक

Kitchen Tips : केळी लवकर काळी पडतात किंवा जास्त पिकतात? मग साठवण्याची पद्धत बदला.

Sakshi Sunil Jadhav

फळं आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची असतात. आपल्या घरात वेगवेगळी फळं असतात. बऱ्याचदा आपण ती खायला विसरतो आणि ती खराब व्हायला सुरुवात होते. त्यातलं एक फळ म्हणजे केळ. केळी लवकर काळी पडतात किंवा लगेचच पिकतात. मग केळी साठवण्याची पद्धत बदलण्याची गरज आहे. बरेचजण केळी फ्रिजमध्ये ठेवतात किंवा सफरचंद, अवोकाडो यांसारख्या फळांसोबत एका बाऊलमध्ये ठेवतात. पण यामुळे केळी लवकर पिकतात. केळी बरेच दिवस ताजी ठेवण्यासाठी नेमकी कुठे आणि कशी ठेवायची हे जाणून घ्या.

केळी लवकर का पिकतात?

केळी तोडल्यानंतरही पिकण्याची प्रक्रिया सुरूच राहते. केळीमध्ये नैसर्गिकरीत्या इथिलीन नावाचा वायू तयार होतो. त्याच वायूमुळे केळीतल्या स्टार्चचं साखरेत रूपांतर होतं. त्यामुळे केळीची साल हिरवीवरून पिवळी होते आणि ती मऊ होतात. सफरचंद आणि अ‍ॅवोकाडो अशी फळंही इथिलीन वायू सोडतात. त्यामुळे ही फळं केळ्यांसोबत ठेवल्यावर केळी लवकर पिकू शकतात.

केळी जास्त दिवस ताजी ठेवण्यासाठी ५ टिप्स

१. केळी वेगळी ठेवा: केळी सफरचंद, अ‍ॅव्होकॅडो आणि पिकणाऱ्या इतर फळांपासून लांब ठेवा.

२. केळी टांगून ठेवा: केळी देठाच्या बाजूने हुकला टांगून ठेवल्याने त्यांच्यावर दाब पडत नाही. त्यामुळे डाग आणि ठेच लागण्याची शक्यता कमी होते.

३. थंड आणि सावलीची जागा निवडा: केळी सूर्यप्रकाशात किंवा गॅसजवळ ठेवू नका. हवेशीर आणि थंड जागी ठेवा.

Gold Rate Today : सोनं-चांदीचे दर पुन्हा बदलले! वाचा सुवर्णनगरीतला 18K, 22K आणि 24K चा आजचा भाव४. प्लास्टिकच्या पिशवीत ठेवू नका: पिशवीमध्ये ओलावा आणि इथिलीन वायू अडकू शकतो. त्यामुळे केळी लवकर खराब होण्याची शक्यता असते.

५. योग्य वेळी फ्रिजमध्ये ठेवा: केळी पूर्ण पिकल्यावर फ्रिजमध्ये ठेवा. यामुळे ती आणखी २ ते ३ दिवस टिकू शकतात. फ्रिजमध्ये ठेवल्याने साल तपकिरी होऊ शकते; मात्र आतील गर चांगला राहू शकतो.

हिरवी केळी फ्रिजमध्ये ठेवू नका!

कच्ची किंवा हिरवी केळी फ्रिजमध्ये ठेवणं टाळा. ५६°F (सुमारे १३.३°C) पेक्षा कमी तापमानात केळ्यांना थंडीमुळे इजा होऊ शकते. त्यामुळे त्यांचा रंग आणि पिकण्याची प्रक्रिया बिघडू शकते.

लक्षात ठेवा: केळी आधी खोलीच्या तापमानात पिकू द्या आणि योग्य पिवळा रंग आल्यानंतरच फ्रिजमध्ये ठेवा. ही छोटी सवय केळी जास्त दिवस चांगली ठेवण्यास मदत करू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या चर्चेदरम्यान संजय काकडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधाण

Anant Singh Daughter: चर्चा तर होणारच! ४ लाख पाहुणे, जेवणात १५० मेनू अन् जावयाला २ कोटींची गाडी! आमदाराच्या मुलीचा शाही लग्नसोहळा

Sakal Global Lit Fest: पुणेकरांसाठी साहित्य आणि संस्कृतीची पर्वणी! १२ ते १५ नोव्हेंबरदरम्यान रंगणार 'सकाळ ग्लोबल लिट फेस्ट'

Gold Rate Today : सोनं-चांदीचे दर पुन्हा बदलले! वाचा सुवर्णनगरीतला 18K, 22K आणि 24K चा आजचा भाव

Why Do People Talk In Sleep: झोपेत बोलण्याची सवय का लागते?

SCROLL FOR NEXT