How To Control Overthinking Saam tv
लाईफस्टाईल

सततच्या Overthinking मुळे वैतागले आहात? या टीप्स फॉलो करा, मेंदू राहिल शांत

How To Control Overthinking : तणावमुक्त जीवन जगण्यासाठी अनेकजण स्वत:ला शांत ठेवण्याचा प्रयत्न करतात. काही लोक प्रत्येक गोष्टीबद्दल खूप विचार करतात. सततच्या अतिविचारामुळे मानसिक आरोग्यासह शारीरिक आरोग्यावरही परिणाम होतो.

कोमल दामुद्रे

Symptoms Of Overthinking :

तणावमुक्त जीवन जगण्यासाठी अनेकजण स्वत:ला शांत ठेवण्याचा प्रयत्न करतात. काही लोक प्रत्येक गोष्टीबद्दल खूप विचार करतात. सततच्या अतिविचारामुळे मानसिक आरोग्यासह शारीरिक आरोग्यावरही परिणाम होतो.

अतिविचारामुळे आपण भावनिकदृष्ट्या अधिक कमकुवत होतो. कोणतेही गोष्ट मनावर घेतो. पुढे काय होणार याची सतत चिंता करतो. ज्यामुळे वैयक्तिक आणि व्यवसायिक जीवनावर अधिक परिणाम होतो.

अतिविचार करणे ही एक प्रकारची मानसिक समस्या (Mental Health) आहे, ज्यातून वेळीच बाहेर पडणे जास्त गरजेचे असते. अतिविचारामुळे आपण अनेक गंभीर आजारांना (Disease) बळी पडू शकतो. या परिस्थितीतून बाहेर कसे पडायचे? कोणत्या टीप्स (Tips) फॉलो करायला हव्या? जाणून घेऊया

1. स्वत:ला व्यस्त ठेवा

जर तुम्ही रिकामे बसले असाल, कोणतेही काम करत नसाल तर तुम्ही अधिक विचार करु लागता. अशावेळी स्वत:च्या मनाला दुसरीकडे वळवण्यासाठी किंवा त्याला शांत करण्यासाठी स्वत:ला व्यस्त ठेवा. तुम्हाला ज्या गोष्टींमध्ये अधिक आनंद मिळतो. त्यामध्ये गुंतून राहाण्याचा प्रयत्न करा.

2. नकारात्मक लोकांपासून दूर राहा

ज्या लोकांकडून तुम्हाला सतत नकारात्मकता मिळते. अशा माणसांपासून दूर राहा. समोरची व्यक्ती मुद्दामहून तुम्हाला त्रास देत असेल तर त्याच्याशी बोला, त्याच्या वागण्यामागचे कारण विचारा. जर तुम्हाला अधिक त्रास होत असेल तर बोलणे बंद करा.

3. ध्यान

मन शांत ठेवण्यासाठी योग आणि ध्यान करा. ध्यान तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवते. ज्यामुळे अतिविचार करण्याची सवय थांबू शकते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: ओळखपत्र,मोबाईल हिसकावला नंतर खांबाला बांधलं; ड्युटीवर निघालेल्या लष्कर जवानासोबत टोल कर्मचाऱ्यांचं संतापजनक कृत्य

Pregnancy Tips : गर्भावस्थेतील मधुमेह नियंत्रणात ठेवणे का आवश्यक आहे?

Pandharpur: डॉल्बीच्या आवाजामुळे एकाचा मृत्यू, दंहीहंडीचा कार्यक्रम पाहायला आला अन्...; पंढरपुरात खळबळ

Hair Loss Remedie : टक्कल पडण्याची समस्या? हे घरगुती उपाय करतील मदत

Rahul Gandhi: व्होट चोरीवरून टोकदार प्रश्न, निवडणूक आयोगानं दिली उत्तरं; तुम्ही समाधानी आहेत का?

SCROLL FOR NEXT