Bali Tour Package Saam Tv
लाईफस्टाईल

Bali Trip : काय सांगता! २० हजारात फिरता येणार बाली, असे करा ट्रिपचे नियोजन

How To Plan Cheap Bali Trip : हिवाळा सुरु झाला की, गुलाबी थंडीत प्रत्येकाला फिरण्याची आवड असते. पण कामाचा व्याप आणि बजेटमुळे आपल्याला बरेचदा फिरता येत नाही. परंतु, जर तुम्हाला परदेशात ट्रिप करायची असेल तर तुम्ही आता २० हजारात फिरता येईल.

कोमल दामुद्रे

Budget Trip In Bali :

हिवाळा सुरु झाला की, गुलाबी थंडीत प्रत्येकाला फिरण्याची आवड असते. पण कामाचा व्याप आणि बजेटमुळे आपल्याला बरेचदा फिरता येत नाही. परंतु, जर तुम्हाला परदेशात ट्रिप करायची असेल तर तुम्ही आता २० हजारात फिरता येईल.

बाली हा इंडोनेशिया (Indonesia) देशातील एक प्रांत आहे. छोट्या सुंद बेटावर अतिपश्चिमेला बाली वसलेले आहे. हा प्रांत जावाच्या पूर्वेला आणि लोंबोकच्या पश्चिमेला असून बाली द्वीप तसेच नूसा पेनिडा,नूसा लेंबोन्गन व नूसा सेनिन्गन ही लहान द्वीपे या प्रांताचा भाग आहेत. बालीच्या समुद्रकिनाऱ्यावर अनेक प्रकारचे दुर्मिळ मासे आणि कासवे पाहायला मिळतात.

इंडोनेशियातील सर्वात नेत्रदीपक आणि सांस्कृतिक शहरांच्या यादीत बाली सगळ्यात आधी आहे. जर तुम्हालाही बालीला जायचे असेल तर आम्ही तुम्हाला बाली ट्रिपचा (Trip) स्वस्तातील प्लान सांगणार आहोत. जाणून घेऊया कसे

1. व्हिसा

बालीला जाण्यासाठी भारतीयांना व्हिसा फ्री प्रवास (Travel) करता येणार आहे. या ठिकाणी तुम्ही एक महिना भेट देऊ शकता. त्यामुळे तुमचा व्हिसा खर्चही वाढेल.

2. ट्रिपचा प्लान कसा कराल?

  • जर तुम्ही बालीला जाण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही ऑफ सीझनमध्ये जाण्याचा प्रयत्न करा. कारण यावेळी तिकीटाचे पैसे कमी असतात.

  • दिल्लीपासून बालीचे तिकीट हे १२ हजार रुपयांपर्यंत आहे. त्यात अनेक बँका आणि क्रेडिट कार्डवरुन चांगल्या ऑफर्स मिळत आहे. त्यामुळे तिकीट तुम्हाला १० हजार रुपयांपर्यंत मिळेल.

  • बालीमध्ये हॉटेलचा खर्च हा १५०० ते २००० रुपयांपर्यंत येऊ शकतो.

  • जेवणाचा खर्च करताना थोडे अधिक पैसे खर्च करावे लागतील. परंतु, रेस्टॉरंटमध्ये खाण्याऐवजी स्ट्रीट फूड ट्राय करु शकता.

  • कॅब बुक करण्याऐवजी तुम्ही स्थानिक वाहतुकीने प्रवास करुन पैसे वाचवू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT