Stress Management Saam Tv
लाईफस्टाईल

Stress Management : परीक्षेचं टेन्शन होईल दूर; तणावमुक्त राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी या टिप्स फॉलो करा

How to overcome exam anxiety : उद्यापासून बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरु होणार आहेत. त्यानंतर काही दिवसांनी दहावीच्या परीक्षा सुरु होतील. अशातच मुले परीक्षेचा अधिक ताण घेतात. ज्यामुळे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.

कोमल दामुद्रे

How To Manage Child Exam Stress :

उद्यापासून बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरु होणार आहेत. त्यानंतर काही दिवसांनी दहावीच्या परीक्षा सुरु होतील. अशातच मुले परीक्षेचा अधिक ताण घेतात. ज्यामुळे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.

परीक्षेचा (Exam) ताण घेतल्यामुळे मुलांना नेमका अभ्यास कुठून करावा हे समजत नाही. आपण केलेला अभ्यास लक्षात राहिल ना, पेपर सोपा जाईल ना असे एक नी अनेक प्रश्न मुलांच्या डोक्यात येत असतात. ज्यामुळे त्यांना अधिक ताण (Stress) येतो. अशावेळी पालकांनी मुलांची काळजी घ्यायला हवी.

अभ्यासाशिवाय मुलांना त्यांच्या आहाराची (Food) आणि दिनचर्येकडे देखील लक्ष द्यायला हवे. अभ्यासासाठी पूर्ण वेळ मिळेलच शिवाय योग्य विश्रांतीही मिळेल ज्यामुळे मुलांना अधिक ताण येणार नाही. परीक्षेच्या काळात मुले रात्रदिवस अभ्यास करतात ज्यामुळे तणावापासून दूर राहाता येईल.

1. अभ्यासाचे वेळापत्रक बनवा

पालकांनी मुलांच्या अभ्यासाचे वेळापत्रक बनवायला हवे. तसेच ते कशाप्रकारे अभ्यास करताय याचे अनुसरण करा. त्याच्या खाण्यापिण्याची वेळ, झोप आणि आराम करण्याची वेळ ठरवा. मुलांवर जबरदस्ती अभ्यासाचे ओझे देऊ नका.

2. मन मोकळे करायला शिकवा

मुलांना श्वास घेण्याचे काही व्यायाम शिकवा. ज्यामुळे त्यांना ताण किंवा भीती वाटू लागली की, ते ध्यान करु शकतील. यामुळे ताण कमी होण्यास मदत होईल. शरीराला आराम मिळाल्याने मनालाही आराम मिळेल.

3. अभ्यास करताना शांत वातावरण

मुले अभ्यास करत असतील तर घरातील वातावरण शांत ठेवा. आवाज होईल अशा कोणत्याही गोष्टी करु नका. अभ्यासाचे सर्व साहित्य आणि नोट्स स्टडी टेबलवर ठेवा. ज्यामुळे मुलांचा वेळ वाया जाणार नाही.

4. मुलांना आधार द्या

परीक्षेच्या काळात मुलांना भीती वाटते, दडपण येते. अशावेळी पालकांनी मुलांना जवळ घेऊन समजवावे. तसेच त्यांना मानसिक आधार द्यावा. परीक्षेत कमी गुण मिळण्याची भीती त्याच्या मनात निर्माण होऊ शकते. यासाठी मुलांना आधार द्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये काही पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या रांगा

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना ₹३००० एकत्र मिळणार; लाभार्थी महिलांचा आकडा आला समोर, वाचा अपडेट

Maharashtra politics : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत भूकंप; पटेल, तटकरे अन् भुजबळांना डच्चू? कार्यकारिणीच्या नव्या यादीने खळबळ

Zodiac Sign Lucky Colour: कोणत्या राशीसाठी कोणता रंग शुभ? तुमच्या आयुष्यात होईल भरभराट

Virar: विरारमध्ये सूर्या धरणाची मुख्य पाईपलाईन फुटली, ३० ते ४० फूट उंच पाण्याचे फवारे उडाले; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT