Ukdiche Modak  Canva
लाईफस्टाईल

Modak Recipe : उकडीचे मोदक बनवायचे आहे? कळ्या पाडताना तुटतात, या सोप्या टिप्सची मदत घ्या

उकडीचे मोदक बनवायचा आहे तर या टिप्स वापरा

कोमल दामुद्रे

Modak Recipe : अवघ्या काही क्षणानंतर बाप्पा आपल्या सगळ्यांच्या घरी विराजमान होईल. बाप्पा घरोघरी आल्यानंतर वातावरण अगदी प्रफुल्लीत होऊन जाईल.

स्वयंपाकघरात बनवल्या जाणाऱ्या बाप्पाच्या आवडत्या नैवेद्याचा सुगंध चहुकडे दरवळेल. आपल्यापैकी बरेच जण बाप्पाला नाना तऱ्हेचे मोदक नैवेद्य म्हणून ठेवतात परंतु, उकडीच्या मोदकाची चव काही औरच !

बाजारात मिळणारे उकडीचे मोदक असो किंवा ते साच्यातून बनवले जाणारे मोदक असो आपल्याला ते फारसे रुचतही नाही व पटतही नाही. पण, सुंदर कळ्या येणारे मोदक आपल्याला जमत नाही. एकतर कळ्या पाडताना ते तुटतात किंवा वाफवल्यानंतर त्याचे सारण त्यातून बाहेर होते. मग अशावेळी आपली चिडचिड होते. तुम्हाला सुंदर कळ्या येणाऱ्या उकडीचे मोदक बनवायचे आहे तर जाणून घेऊया सोप्या टिप्स

१. उकडलेल्या तांदळाच्या (Rice) पिठाचा गोळा घेऊन त्याला चांगले मळून घ्या. नंतर त्याला पीठ लावून त्याची पुरी लाटा.

२. तयार पुरीमध्ये गुळ, खोबरे, ड्रायफ्रूट्स व माव्याचे मिश्रण भरा. सारणाचा गोळा व्यवस्थितरित्या पुरीवर ठेवून घ्या.

Ukdiche Modak Recipe Tips

३. हातांच्या बोटाला तेल (Oil) लावून घ्या. हातावर ही लाटलेली पुरी घेऊन दोन बोटांच्या मधोमध पुरी पकडून त्याला हळूहळू बोटांच्या साहाय्याने फिरवा व कळ्या पाडून घ्या.

४. कळ्या पाडताना सारणाला अंगळ्याच्या साहाय्याने पकडून ठेवा व हलक्या हाताने ह्या कळ्या पाडत जा.

५. कळ्या पाडू झाल्यानंतर दोन्ही हाताने अलगद त्याला गोलगोल फिरवा. लक्षात ठेवा हात फिरवताना कळ्या दुमडल्या जाणार नाही.

६. मोदकाचे टोक काढून झाल्यानंतर कळ्यांना चमच्याच्या खालचे टोक फिरवून घ्या. त्यानंतर पुन्हा एकदा उकड काढा व वरुन साजूक तूप घालून बाप्पाला नैवेद्य ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thackeray Family Reunites : अभूतपूर्व ऐतिहासिक क्षण! राज- उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण कुटुंब एकत्र | पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा

Sara Ali Khan: पतौडीच्या राजकुमारीचे क्यूट बार्बी डॉल लूक पाहिलेत का?

Mental Health: तुमची मानसिक स्थिती बदलत आहे का? 'या' ५ लक्षणांवर लक्ष ठेवा

Ladki Bahin Yojana : 'पोर्टल बंद, नव्या नोंदणी होणार नाहीत'; उद्धव ठाकरेंनी लाडक्या बहिणींचं भविष्यच सांगितलं

SCROLL FOR NEXT