Ganesh Chaturthi 2022 Saam Tv
लाईफस्टाईल

Ganesh Chaturthi 2022 : नैवेद्यम् समर्पयामि..! गणपतीला दाखवा या पदार्थांचा नैवेद्य, होतील अनेक मनोकामना पूर्ण

गणपतीला याप्रकारे नैवेद्याची थाळी ठेवा.

कोमल दामुद्रे

Ganesh Chaturthi 2022 : १४ विद्या आणि ६४ कलेचा अधिपती मानलेल्या भगवान गणेशाला बुध्दिचा देवता म्हणून ओळखले जाते. असे म्हटले जाते, कोणाच्याही हृदयात स्थान मिळवायचे असेल तर त्याचा मार्ग हा त्याच्या पोटाजवळ असतो. मग ती व्यक्ती असू देत किंवा देव.

कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात ही श्रीगणेशाच्या वंदनाने होते. अनेक कार्यात श्रीगणेशाला (Ganpati) मान देऊन त्या कार्याची सुरुवात केली जाते. बाप्पाला आवडणाऱ्या व सर्वात प्रिय असणाऱ्या मोदकाचा समावेश केला जातो.

नैवेद्य म्हणजे देवास अर्पण करावयाचा पदार्थ. पूजा करताना षोडशोपचार करण्यात येतात त्यावेळी हा नैवेद्याला अधिक महत्त्व दिले जाते.

श्रीगणेशाला खूश करण्यासाठी आपण त्यांना अनेक प्रकारचे पदार्थ त्याच्या पुढ्यात ठेवतो परंतु, नैवेद्यात कोणते पदार्थ असायला हवे हे आपल्याला कळत नाही. त्यासाठी जाणून घेऊया, नैवेद्याच्या थाळीत कोणते पदार्थ असायला हवे.

नैवेद्याच्या थाळीत आपण गणपतीच्या आवडीचे मोदक, पनीरची भाजी, पुरी, मसाले भात, भजी, गाजर व काकडीची कोशिंबीर, खमंग अशी वाटली डाळ, पापड, कुरडई याचा समावेश आपण करू शकतो.

Ganpati Niavedya Thali

तसेच नैवेद्याच्या थाळीत आपण गणपतीसाठी उकडीचे किंवा माव्याचे मोदक, भरलेली भेंडी, गव्हाची खीर, वरण-भात व साजूक तूप, पुलाव, सुकी भाजी व पुरी आणि कोशिंबीरीचा रायता या पदार्थांनी आपण नैवेद्याचे ताट तयार करु शकतो.

नैवेद्याचे ताट तयार झाल्यानंतर केळीच्या (Banana) पानावर वाढून गणपतीला त्याचा नैवेद्य दाखवा व त्यासोबत हा मंत्र म्हणा.

नैवेद्यं गृह्यतां देव भक्तिं में ह्यचलां कुरु ।

ईप्सितं मे वरं देहि परत्र च परां गतिम् ।।

शर्कराखण्डखाद्यानि दधिक्षीरघृतानि च ।

आहारं भक्ष्यभोज्यं च नैवेद्यं प्रतिगृह्यताम् ।।

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT