Amla Pickle Recipe Saam Tv
लाईफस्टाईल

Amla Pickle Recipe : चटपटतील आवळ्याच्या लोणच्याची चव चाखलीये का ? पाहा रेसिपी

Easy Pickle Recipe: आंब्यापासून ते फणसाच्या लोणच्यापर्यंत लोक आपल्या घरी ठेवतात.

कोमल दामुद्रे

How To Make Amla Pickle : अनेकांना वेगवेगळ्या प्रकारची लोणची खायला आवडते. त्यासाठी ते अनेक प्रकारची लोणची घरात बनवतात. आंब्यापासून ते फणसाच्या लोणच्यापर्यंत लोक आपल्या घरी ठेवतात.

काही लोणची बनवायला सोपी असतात. पण काही लोणची बनवण्याची पद्धत वेगळी असते. आवळा लोणचे खायला खूप चविष्ट आहे. आवळा लोणचे तयार होण्यास बराच वेळ (Time) लागतो. त्यामुळे लोक ते बनवण्यास थोडेसे टाळतात. पण आज आम्ही आवळा लोणची बनवण्याची सोपी पद्धत घेऊन आलो आहोत. जे तुम्ही मायक्रोवेव्हच्या मदतीने कमी वेळात बनवू शकता.

1. साहित्य

  • आवळा 250 ग्राम

  • मोहरी - 1 चमचा

  • मेथी दाणे - 1 चमचे

  • मोहरीचे तेल (Oil) - 2 चमचे

  • लाल तिखट - 1 चमचे

  • मीठ - चवीनुसार

कृती

  • लोणचे बनवण्यासाठी सर्वप्रथम मायक्रोवेव्हमध्ये एका भांड्यात मोहरी आणि मेथीचे दाणे टाका आणि 30 सेकंद चांगले बेक करा.

  • त्यानंतर ग्राइंडरमध्ये टाकून बारीक करा. दुसरीकडे, ताजे आवळे चांगले धुवा आणि वाळवा.

  • आता आवळ्याच्या बिया काढून त्याचे छोटे तुकडे करा. यानंतर आवळ्याचे कापलेले तुकडे एका भांड्यात काढा.

  • त्यावर थोडे मीठ शिंपडा आणि चांगले मिसळा.

  • आवळा थोडा वेळ असेच ठेवा आणि मायक्रोवेव्हमध्ये 30 सेकंद बेक करा.

  • आता या आवळ्यामध्ये मोहरी आणि मेथीची पूड तयार केलेला मसाला घाला.

  • यानंतर मीठ, मोहरीचे तेल आणि लाल तिखट घालून मिक्स करा.

  • सर्व साहित्य मिक्स केल्यानंतर, आवळा पुन्हा मायक्रोवेव्हमध्ये 2 मिनिटे बेक करा.

  • तुमचे आवळा लोणचे खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही जेवण म्हणून किंवा तुमच्या स्नॅक्ससोबत त्याचा आनंद घेऊ शकता. (Lifestyle News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : दिव्यांग शेतकऱ्यांच्या कांद्याला अवकाळी पावसाचा फटका

Sugarcane juice: उस आणि मशिन न वापरता घरच्या घरी तयार करा उसाचा रस

Heart Disease Diet : चाळीशीनंतरही होणार नाहीत ह्रदयविकाराच्या समस्या, आहारात करा या ४ पदार्थांचा समावेश; डॉक्टरांनी दिला सल्ला

Designer Blouse: लग्नसराईत प्लेन साडीत पण दिसाल उठून, ट्राय करा हे ७ ट्रेंडी युनिक स्वस्त डिझायनर ब्लाऊज

Chocolate Dry fruit Shake: उन्हाळ्यात प्या चॉकलेट ड्राय फ्रुट शेक; राहाल दिवसभर फ्रेश

SCROLL FOR NEXT