लाईफस्टाईल

Personal Safety Tips For Women : महिलांनी प्रवास करताना ४ गोष्टी लक्षात ठेवाच; स्वत:च करा स्वत:ची सुरक्षा

Safe Travel For Women: सध्याचे वातावरण पाहता महिलांना घरातून बाहेर पडणे कठीण झाले आहे. महिलांना आता घराबाहेर पडणं असुरक्षित वाटू लागलं आहे. मात्र रोजगाराचा प्रश्न त्यांच्यासमोर उभाच आहे.

Saam Tv

सध्याचे वातावरण पाहता महिलांना घरातून बाहेर पडणे कठीण झाले आहे. महिलांना आता घराबाहेर पडणं असुरक्षित वाटू लागलं आहे. मात्र रोजगाराचा प्रश्न त्यांच्यासमोर उभाच आहे. पण काही ठिकाणी महिलांना घराबाहेर पडणे सुरक्षित नसते. अशा परिस्थितीत, महिलांना अनेकदा त्यांच्या सुरक्षिततेबद्दल काळजी वाटते. महिलांवरील अत्याचाराच्या घटणांमध्ये आता लक्षणीय वाढ होत असल्याचे दिसते. विशेषत: संध्याकाळच्या वेळेस महिलांना घराबाहेर पडणं सगळ्यात भितीदायक वाटू लागलय.

मीडिया रिपोर्टनुसार, अलिकडेच पुणे पोलिसांनी वार्षिक गुन्ह्यांची आकडेवारी सादर केली. या प्रसंगी बोलताना, पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, "महिलांशी संबंधित गुन्ह्यांची त्वरित आणि मुक्त नोंदणी झाल्यामुळे" बलात्कार आणि विनयभंगाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. २०२४ मध्ये बलात्काराचे ५०५ आणि विनयभंगाचे ८६४ गुन्हे दाखल झाले, तर २०२३ मध्ये बलात्काराचे ४१० आणि विनयभंगाचे ७७५ गुन्हे दाखल झाले. अशा परिस्थित महिलांनी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत त्या पुढील प्रमाणे आहेत.

१. फोन कॉल करा

तुम्ही घराबाहेर एकटे असताना, तुमच्या भावाला, बहिणीला, वडिलांना, पतीला किंवा मित्राला फोन करू शकता. अशा परिस्थितीत, तुम्ही घरी पोहोचण्याची वेळ आणि ऑटो किंवा कॅबचा नंबर याबद्दल सर्व काही सांगू शकता.

२. रस्त्यावर गर्दीचा रस्त्याने चाला

रस्त्याच्या कडेला एकटे चालत असताना, नेहमी वाहतुकीच्या विरुद्ध दिशेने चालत जा. यामुळे तुम्हाला समोरून येणारी वाहतूक पाहता येईल आणि मागून हल्ला होण्याची भिती कमी होईल.

३. सगळीकडे लक्ष असू द्या

एकटे प्रवास करताना तुम्हाला असुरक्षित वाटत असेल तर ताबडतोब तुमच्या जवळच्या व्यक्तीला ऑटो किंवा कॅब नंबर मेसेज करा. याशिवाय, तुम्ही गुगल मॅप्सवर जवळच्या पोलिस स्टेशन आणि पीसीआरचे स्थान तपासा.

४. सुरक्षिततेची साधने

रस्त्याच्या कडेला एकटे चालत असताना, नेहमी वाहतुकीच्या विरुद्ध दिशेने चालत जा. तसेच बाहेर एकटे असताना होणारे अपघात टाळण्यासाठी तुम्ही काही सुरक्षिततेची साधने वापरू शकता. अशा परिस्थितीत महिलांच्या सुरक्षेसाठी, त्यांनी सांगितले की '१०९१' ही टोल-फ्री हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे.

या क्रमांकावर कॉल केल्यानंतर, जवळच्या पोलिस स्टेशनचे बीट मार्शल आणि दामिनी मार्शल तात्काळ घटनास्थळी पोहोचतात आणि समस्या सोडवतात, असे त्यांनी सांगितले. '८९७५९५३१००' हा एक व्हॉट्सअॅप नंबर देखील आहे ज्यावर महिला त्यांच्या तक्रारी पाठवू शकतात, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bullet Train: अबब! 12 मजली इमारती इतका उंच अन् 480 मीटर लांब; बुलेट ट्रेनसाठी साबरमती नदीवर उभारला भव्य पूल, काय आहे पुलाची खासियत? वाचा

Maharashtra News Live Update: ठाण्यातील पुर्णेकर हत्या प्रकरणावरून आता आगरी समाज आक्रमक

Copper Utensils : धनतेरसपूर्वी तांबे-पितळाची भांडी घेताय? शुद्धता ओळखण्यासाठी या ट्रिक येतील कामी

Rice Water Benefits for Skin : चेहऱ्यावर तांदळाचे पाणी लावल्याने होतात ‘हे’ 5 चमत्कारिक फायदे; काळे डाग अन् सुरकुत्या होतील गायब

Avocado Benefits: हृदयापासून त्वचेपर्यंत फायदेशीर 'हे' एक फळ; जाणून घ्या ७ फायदे आणि कसे खावे

SCROLL FOR NEXT