Pink Blush Makeup Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Pink Blush Makeup Tips : पिंक ब्लश मेकअप लूक कसा करावा? जाणून घ्या टीप्स

Makeup Tips : आपण सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे लूक कस्टमाईज करतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Pink Blush Makeup : आपण सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे लूक कस्टमाईज करतो. सोबतच लूक चांगला होण्यासाठी आऊटफिटनुसार तुम्ही मेकअप करणे अत्यंत गरजेचे आहे. बऱ्याचदा अनेक मुली पिंक ब्लश मेकअप करने पसंत करतात. परंतु चांगला मेकअप लूक होण्यासाठी तुम्हाला अनेक गोष्टीची काळजी घेणे आवश्यक आहे.

आज आम्ही तुम्हाला या लेखामधून महत्वाच्या टीप्स (Tips) सांगणार आहोत. ज्यामध्ये सांगितलेल्या टीप्समुळे तुम्ही अतीशय सुंदर आणि चांगला मेकअप करू शकाल. आताच तयार झालेल्या एका वर्कशॉपमध्ये ब्युटी एक्स्पर्ट (Expert) निंगल धीर यांनी पिंक ब्लश मेकअप लूक बद्दल काही खास टिप्स आपल्या सोबत शेअर केल्या आहेत.

बेस कसा तयार करावा -

तुम्हाला जर का पिंक ब्लश मेकअप लूक हवा असेल तर, तुम्हाला मेकअप बेस ड्यूई ठेवायला पाहिजे. असं केल्याने तुम्ही लावलेला ब्लश अतीशय सुंदर आणि हायलाईट होउन दिसेल. यासाठी तुम्ही लिक्विड हायलाईटरचा वापर करू शकता. सोबतच तुम्ही टिंटेड प्रायमरचा वापर करू शकता. लिक्विड हायलाईटरचे दोन थेंब फाउंडेशनमध्ये मिक्स करून तुम्ही एक उत्तम बेस बनवू शकता.

नॅचरल फिनिशिंग महत्त्वाची आहे -

पिंक ब्लश तेव्हाच चांगली दिसते जेव्हा मेकअप नॅचरल आणि मिनीमल असेल. याशिवाय तुम्ही हेवीबेस मेकअपचा वापर कराल तर, तुमचा मेकअपलुक अतिशय भरगच्च दिसेल. त्यासाठी तुम्ही हवं असेल तर फक्त कन्सीलरच्या सहाय्याने काळे डाग लपवू शकता आणि फाउंडेशन स्किप करू शकता. सोबतच संपूर्ण मेकअप ब्लेंड करण्यासाठी तुम्ही ब्युटी ब्लेंडरचा वापर करा. ब्युटी ब्लेंडरच्या वापराने तुमचा मेकअप अतिशय सुंदर दिसेल.

त्वचेची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे -

जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा चेहरा मेकअप केल्यानंतर सुंदर दिसायला हवा आणि लावलेल ब्लश तुमच्यावर सूट करेल तर, तुमच्या त्वचेची काळजी घेण्यात कोणतीही कसर सोडू नका. यासाठी त्वचेला हायड्रेट ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी तुम्ही फेस ओईल, शीटमास्क आणि फेस सिरमचा वापर करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pitru Paksha 2025: पितृपक्षात कोणत्या वस्तू खरेदी करू नये?

Golden Man Crime : पुण्यासारखं पनवेलमध्येही गँगवॉर, गोल्डमॅन अन् म्हात्रे भिडले, १४ आरोपींवर गुन्हा, वाचा नेमकं प्रकरण

Ladki Bahin Yojana: लाडकीसाठी खुशखबर, ऑगस्टचे ₹१५०० खात्यात खटाखट येणार, सरकारने उचलले मोठं पाऊल

Maharashtra Live News Update : नागपूर विभागात पाच भागात असणार वीजपुरवठा बंद

Lalbaugcha Raja: मुंबईतील लालबागचा राजा मंडळात गरबा होणार; गणेश मंडळ उद्योगपतींकडून हॅकजॅक, मनसेचा आरोप

SCROLL FOR NEXT