Blanket Cleaning Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Blanket Cleaning Tips : पाणी आणि डिटर्जंटने नाही तर या पद्धतीने घरीच ब्लँकेट स्वच्छ करा!

Cleaning Tips : हिवाळ्यात वापरलेल्या उबदार गोष्टी कपाटात ठेवण्याची तयारी सुरू सर्वत्र होते. अशा वेळेस सर्व उबदार गोष्टी साफ करणे गरजेचे आहे.

कोमल दामुद्रे

Home Hacks : लवकरच हिवाळा संपेल आणि उन्हाळा सुरू होणार आहे. त्यामुळे हिवाळ्यात वापरलेल्या उबदार गोष्टी कपाटात ठेवण्याची तयारी सुरू सर्वत्र होते. अशा वेळेस सर्व उबदार गोष्टी साफ करणे गरजेचे आहे.

उबदार कपडे सहज स्वच्छ करता येतात. पण ब्लँकेट घरी स्वच्छ करणे कठीण असल्यामुळे आपण बाहेर ड्राय क्लीनसाठी देतो त्यात खूप पैसे जातात. आम्ही तुम्हाला पाणी (Water) आणि डिटेल्स यांचा वापर न करता घरच्या घरी (Home) सोप्या पद्धतीने ब्लॅंकेट स्वच्छ (Clean) करण्यासाठी काही टिप्स (Tips) देणार आहोत.

1. ब्लँकेट उन्हात वाळवा

मळालेली ब्लँकेट स्वच्छ करण्यासाठी सामान्यतः लोक पाणी आणि डिटर्जंटचा वापर करतात. मात्र असे न करताही तुम्ही ब्लँकेट स्वच्छ करू शकता. त्यासाठी तुम्हाला केवळ 4-5 दिवसांसाठी ब्लॅंकेट काही तास सूर्यप्रकाशात ठेवावे लागते. त्यामुळे ब्लॅंकेटच्या वासासोबत बॅक्टेरिया ही नष्ट होतात त्यामुळे ब्लॅंकेट धुण्याची गरज नाही.

2. ब्लँकेटवरील डाग बेकिंग सोड्याने साफ करा

ब्लँकेटवरचे डाग पाहून आपल्याला समोर दोन पर्याय राहतात. ब्लँकेट धुणे किंवा ड्राय क्लीनिंगला देणे या मार्गाचा विचार करतो. मात्र ब्लँकेट्सचे डाग तुम्ही न धुता काढण्याचे अनेक मार्ग आहेत. बेकिंग सोडा हा त्यातील सर्वात प्रभावी मार्ग आहे.

बेकिंग सोड्याचा वापर करण्यासाठी तुम्हाला फक्त ब्लँकेटवर डाग असलेली जागेवर ओलसर स्वच्छ कापडाने पुसायचे आहे आणि बेकिंग पावडर पूर्णपणे शिंपडावी लागेल. नंतर काही वेळाने बेकिंग पावडर काढून टाका. ब्लँकेटवरील डाग पूर्णपणे गायब होतील. जर ब्लँकेटवर अधिक डाग असतील, तर ही प्रक्रिया दोन ते तीन वेळा पुनरावृत्ती करणे गरजेचे आहे.

3. ब्लँकेट ब्रशने साफ करा

ब्लँकेट धुण्याचा कंटाळा येत असेल तर ब्लॅंकेट आपण बाहेर ड्राय-क्लीनिंगसाठी देतो. त्यामुळे बाहेरील ड्राय-क्लीनिंग टाळण्यासाठी तुम्ही घरीच ब्रशच्या साह्याने ब्लँकेट स्वच्छ करू शकता. त्यासाठी ब्लँकेटवर हलक्या हातांनी त्यावर मऊ ब्रश फिरवा. त्यानंतर थोडा वेळ ब्लँकेट उन्हात ठेवा.

4. ब्लँकेट घाण होऊ नये म्हणून असे वापरा

ब्लँकेट घाण होण्यापासून रोखण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ते कव्हरने झाकून ठेवावे. त्यामुळे ब्लँकेट ऐवजी केवळ कव्हर धुवावे लागते. कव्हर स्वच्छ करणे सहज आणि सोपे आहे. कव्हर असल्यामुळे कपड्यांवर तेल आणि मसाल्याच्या डागांची काळजी करण्याची गरज नाही, ड्राय क्लीनिंग न करता घरी स्वस्तात स्वच्छ करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Election : आगामी निवडणुकीत RPI महायुतीतून लढणार, पण...; रामदास आठवलेंनी सगळंच सांगितलं

₹23 Crore Bull Not Dead: 23 कोटींच्या 'अनमोल'चा मृत्यू? हट्टाकट्टा रेड्याला अचानक काय झालं?

Richest Women Cricketers : सर्वात श्रीमंत भारतीय महिला क्रिकेटपटू कोण? पहिलं नाव वाचून आश्चर्य वाटेल!

PM, CM ला उडवून देऊ; महाराष्ट्रातील खासदाराची थेट पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्र्यांना धमकी

Maharashtra Politics: बीडमध्ये पुन्हा मुंडे विरूद्ध मुंडे? स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वबळाचा नारा?

SCROLL FOR NEXT