skin care tips in marathi
skin care tips in marathi  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Skin Care : उन्हाळ्यात अशी राखा पायाची सुंदरता

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : कडक उन्हामुळे आणि प्रदूषणामुळे आपल्या पायांचे सौंदर्य बिघडते. पायाची त्वचा (Skin) निस्तेज आणि टॅनिंगने भरलेली असल्यास पायावर किंवा घोट्याला भेगा पडून त्वचेचे सौंदर्य खराब होते. आपण आपल्या चेहऱ्याच्या त्वचेची ज्याप्रकारे काळजी घेतो, त्याचप्रमाणे पायांच्या त्वचेचीही काळजी घेणे आवश्यक आहे. पायांच्या त्वचेची काळजी न घेतल्यास बुरशीची समस्या, नखे तुटणे, त्वचेवर डाग येणे आदी समस्या वाढू शकतात, ज्यामुळे पायाचे खराब सौंदर्य होते.

हे देखील पहा -

उन्हाळ्यात आपल्या त्वचेसाठी अनेक उपाय करतो. आपला चेहरा जितका सुंदर असतो तितके त्याची सुंदरता वाढत जाते. परंतु जितकी काळजी आपण चेहऱ्याची घेतो तितकी काळजी आपण पायाची घेतो का? उन्हामुळे जसे आपल्या चेहऱ्यावर टॅन पडतात तसेच आपल्या पायावर देखील टॅनची समस्या निर्माण होते. आपल्या पायाची त्वचा चेहऱ्याच्या त्वचेसारखी मऊ आणि चमकदार करायची असेल, आपण घरच्या घरी आपले पाय सुंदर बनवू शकता.

अशाप्रकारे घ्या काळजी (Care)

- उन्हाळ्यात शक्यतो शूज घालणे टाळा. शूज घातल्यामुळे आपल्या पायांना घाम येतो त्यामुळे पायांना खाज लागते.

- नखांना बुरशी चढत असल्यास समान प्रमाणात सफरचंद सायडर व्हिनेगर आणि पाणी (Water) मिसळून त्यात पाय घाला. अर्धा तास बसा. त्यानंतर, टॉवेलच्या मदतीने पाय कोरडे करुन लॅव्हेंडरच्या तेलाचे काही थेंब नखांवर टाकून मालिश करा.

- त्वचेतील मृत पेशी काढण्यासाठी मध, गुलाबजल साखरेत मिसळवा आणि स्क्रब तयार करून पायाला चांगले मसाज करा. मृत त्वचा निघून जाण्यास मदत होईल.

- पायांची त्वचा उजळ करण्यासाठी भोपळ्याच्या पेस्टमध्ये दालचिनी पावडर आणि दही मिसळा. तयार पेस्ट पायावर लावून अर्धा तासानंतर पाय स्वच्छ धुवा. त्यामुळे पाय मऊ आणि चमकदार होतील.

- टाचांच्या भेगा बऱ्या करण्यासाठी रात्रीच्या वेळी तुरटी आणि मिठाच्या पाण्यात पाय भिजवून २० मिनिटे बसा आणि नंतर ते कोरडे करा. टाचांवर क्रॅक क्रीम, खोबरेल तेल इत्यादी लावा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांनी कंबर कसली

Sanjay Nirupam Joins Shinde Group | संजय निरूपम यांचा शिंदे गटात प्रवेश

Pravin Darekar On Amol Kolhe | अमोल कोल्हेंबाबत मोठा गौप्यस्फोट!

Thane Naresh Mhaske News | उमेदवारी फॉर्म भरताना दोन गटात राडा, काय झालं बघाच!

Kalyan Lok Sabha | उमेदवारीचा गोंधळ, वैशाली दरेकरांची पहिली प्रतिक्रिया!

SCROLL FOR NEXT