Bedsheet Changing Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Bedsheet Changing Tips: सणासुदीला नवीन बेडशीट बदलताय? जाणून घ्या नवीन बेडशीट किती दिवसांनी बदलावी?

How Often Should You Change Bedsheets?: सणासुदीला बेडशीट बदलताय? जुन्या चादरीवर झोपल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो आणि बेडशीट नेमकी किती दिवसांनी बदलावी, याची सविस्तर माहिती जाणून घ्या.

Manasvi Choudhary

दिवाळी किंवा इतर सणासुदीच्या दिवसांत आपण घराची साफसफाई करतो आणि घराला सुंदर लुक देण्यासाठी बेडवर नवीन बेडशीट किंवा बेडशीट अंथरतो. सणासुदीला घर नीटनेटके दिसण्यासाठी बेडशीट बदलणे हा सजावटीचा महत्वाचा भाग मानला जातो. परंतु, सजावटीपेक्षाही आरोग्याच्या दृष्टीने बेडशीट किती दिवसांनी बदलावी आणि जुन्या बेडशीटवर झोपल्याने काय दुष्परिणाम काय होऊ शकतात, हे समजून घेणे जाणून महत्वाचे आहे.

चादर किंवा बेडशीट बदलणे का आवश्यक आहे?

दररोज आपण सामान्यपणे ८ ते ९ तास बेडवर झोपतो. या काळात आपल्या शरीरावरील घाम, मृत त्वचा, शरीरावर जमा झालेले तेल आणि धुळीचे कण बेडशीटवर जमा होतात त्यामुळे आरोग्यावर परिणाम होतात. जर बेडशीट वेळेवर बदलली नाही, तर त्या सूक्ष्म कणांवर जिवाणू, फंगस वाढतात.

जुन्या चादरीवर झोपल्यावर आरोग्यावर होतो परिणाम

बेडशीटवर जमा झालेले किटाणू, अस्वच्छ बेडशीटमुळे अंगाला खाज सुटणे, पुरळ उठणे, एक्झिमा किंवा चेहऱ्यावर पिंपल्स या समस्या वाढतात.

बेडशीटमध्ये साचलेल्या धुळीचे कण आणि डस्ट माइट्स असल्याने श्वासावाटे शरीरात गेल्याने दम्याची लक्षणे किंवा सर्दी-खोकल्याचा त्रास होऊ शकतो.

बेडशीट नेमकी किती दिवसांनी बदलावी?

आरोग्यतज्ज्ञांच्या मते, घरातील बेडशीट आठवड्यातून एकदा किंवा जास्तीत जास्त ७ ते १० दिवसांच्या आत बदलणे महत्वाचे आहे.

जर घरात लहान मुले असतील, कुत्र्या-मांजरांसारखे पाळीव प्राणी असतील किंवा उन्हाळ्याच्या दिवसांत जास्त घाम येत असेल, तर बेडशीट दर ५ ते ६ दिवसांनी बदलणे महत्वाचे आहे.

गोवा जिंकण्यासाठी महाराष्ट्रातील 5 नेत्यांवर सोपवली महत्त्वाची जबाबदारी; विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा मोठा निर्णय

Weather Update: विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता; ६ राज्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट

Sunday Horoscope: आज कोणाला मिळणार पैशांचा फायदा, कोणाच्या आयुष्यात फुलणार प्रेम? वाचा राशिभविष्य

महाराष्ट्रात पुन्हा खंजीर, पुन्हा गद्दारी? 'पवारांचा इतिहास खंजीर खुपसण्याचा; वडेट्टीवारांचा घणाघात

पवारांच्या राष्ट्रवादीला ठाकरेसेनेचं आव्हान, डिलिमिटेशनवरून ठाकरे विरुद्ध पवार

SCROLL FOR NEXT