Coconut Water in Sugar saam tv
लाईफस्टाईल

Coconut Water: उन्हाळ्यात नारळपाणी प्यायल्याने किती प्रमाणात वाढते ब्लड शुगर? जाणून तुम्हालाही बसेल धक्का

Coconut Water in Sugar : उन्हाळ्याच्या दिवसात आपण नारळपाणी पिण्यावर भर देतो. यामुळे शरीरात पाण्याची कमतरता राहत नाही. मात्र तुम्हाला माहितीये का नारळपाणी प्यायल्याने किती प्रमाणात ब्लड शुगर वाढते?

Surabhi Jayashree Jagdish

Health News: उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत आणि घराबाहेर पडल्यानंतर शरीराला थंडावा मिळावा म्हणून आपण विविध प्रकारची पेय पितो. यामध्ये कोल्ड ड्रिंक्स, उसाचा रस किंवा नारळपाणी यांचा समावेश आहे. लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वजण नारळपाणी पितात. यामुळे शरीर हायड्रेट होतं.

पण तुम्ही कधी विचार केला आहे का की नारळ पाण्याचा तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीवर काय परिणाम होतो? खासकरून मधुमेहाच्या रूग्णांवर याचा कसा परिणाम होतो याची तुम्हाला कल्पना आहे का? मधुमेहाच्या रुग्णांसाठी नारळ पाणी किती सुरक्षित आहे हे या आर्टिकलमधून आपण जाणून घेऊया.

नारळपाण्यामध्ये किती असते नॅचरल शुगर?

नारळपाण्याचा नैसर्गिक गोडवा असतो. हा गोडवा प्रामुख्याने ग्लुकोज आणि फ्रुक्टोज सारख्या साखर घटकांपासून येतो. एका मध्यम आकाराच्या नारळामध्ये सुमारे २००-२५० मिली पाणी असतं. यामध्ये सुमारे ५-६ ग्रॅम नैसर्गिक साखर असू शकते. ही मात्रा फार जास्त नाही, पण ती पूर्णपणे शून्यही नाही. त्यामुळे नारळपाण्याचं सेवन कमी प्रमाणात करावं.

नारळ पाणी प्यायल्याने ब्लड शुगर वाढते का?

नारळाच्या पाण्यात साखरेचं प्रमाण कमी असतं आणि ते कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेलं पेय मानलं जातं. त्यामुळे हे पेय रक्तातील साखर हळूहळू वाढवतं. ज्यामुळे रक्तातील साखर अचानक वाढण्याचा धोका कमी मानला जातो.

मधुमेहाच्या रुग्णांनी प्रत्येक प्रकारच्या गोड पदार्थांवर लक्ष ठेवणं महत्वाचं असून एखादी व्यक्ती दिवसातून अनेक वेळा किंवा जास्त प्रमाणात नारळ पाणी पित असेल तर, त्याचा परिणाम ब् शुगरवर होऊ शकतो.

मधुमेही रूग्णांना नारळपाणी पिण्याचे फायदे

नारळपाण्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम सारखे घटक असतात. हे हृदय आणि स्नायूंसाठी फायदेशीर असतात

नारळाच्या पाण्यात फॅट्स नसतात. शिवाय यामध्ये कॅलरीज देखील खूप कमी असतात. जे मधुमेहासाठी खूप महत्वाचं आहे.

अभ्यासानुसार, नारळाच्या पाण्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीराची इन्सुलिन वापरण्याची क्षमता सुधारू शकतात.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भोंदू अशोक खरात कोर्टात हजर; न्यायालयीन कोठडी मिळण्याची शक्यता

ग्रामीण भागातील लाडक्या बहिणींसाठी सरकारने आणली जबरदस्त योजना; आता महिलांना मिळणार २४ लाख रुपये

Gold Rate Today: सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठा बदल; २४k, २२k, १८k सोन्याची प्रति तोळा किती किंमत? वाचा ताजे दर

IPL 2026: 1...2...3 नाही तर तब्बल 11 चेंडू; अर्शदीप सिंगने हद्दच केली, फेकली सर्वात मोठी ओव्हर

Dhurandhar 2 Box Office: बॉक्स ऑफिसवर रणवीर सिंहचा जलवा; 'धुरंधर २' ची १३ दिवसात १५०० कल्बमध्ये एन्ट्री

SCROLL FOR NEXT