daily walking benefits google
लाईफस्टाईल

Walk Side Effects: जास्त चालल्याने शरीरावर होतात हे वाईट परिणाम, वेळीच व्हा सावध; डॉक्टरांनी दिला महत्वाचा सल्ला

How Many Steps Per Day: दररोज चालणं आरोग्यासाठी फायदेशीर असलं तरी जास्त चालल्यामुळे शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात. दिवसाला किती पावलं चालावीत? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत.

Sakshi Sunil Jadhav

चालणं हे प्रत्येकाच्या आरोग्यासाठी महत्वाचं असतं. चालल्याने शरीराला सगळ्यात जास्त फायदा होतो. पण सध्या याचसाठी लोकांना वेळ मिळत नाही. जीवनशैलीत बदल झाल्यामुळे अनेकांना चालायला वेळ मिळत नाही. कारण त्यांच्या कामाच्या, झोपेच्या, जेवणाच्यावेळा बदलल्या आहेत. पण सध्या फिटनेसचा ट्रेंड आल्यामुळे लोक जीम नाही पण चालणं हा सोपा पर्याय निवडतात. पण चालण्याचा तुमच्या शरीरावर दुष्परिणाम सुद्धा होऊ शकतो. कसा ते पुढील माहितीतून आपण जाणून घेणार आहोत.

रोज किती पावलं चालणं फायद्याचं? How many steps should you take each day?

तज्ज्ञांच्या मते, तुम्ही दिवसाला १०,००० पावलं चालणं महत्वाचं आहे. पण हा आकडा तुमच्या वयानुसार, तब्बेती नुसार, फिटनेसनुसार बदलू शकतो. तुम्ही दिवसाला ८ हजार ते १० हजार इतकी पावलं सुद्धा चालू शकता. त्याने सुद्धा तुमच्या शरीराला फायदा होतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जितकी पावलं चालता, तितकं तुमचं आयुष्य वाढतं, अनेक समस्या दूर होतात, पचन सुधारतं, टाईप २ डायबेटीजची समस्या कमी होते, हार्टचे आरोग्य सुधारते.

किती चालणं शरीरासाठी धोकादायक?

चालण्याचा शरीराला फायदा होतोच. पण जर तुम्ही आजारी असाल तर तुमच्या शरीरात जास्त चालण्याची ताकदच नसते. म्हणजेच तुम्ही चालायला गेल्यावर शरीर साथ देत नाही. पण तुम्ही सलग वेगात ३० मिनिटं पहिल्यांदाच चालत असाल तर तुम्हाला वेदना जाणवू शकतात. त्यामुळे तुम्ही तुमची तब्बेत जपून चालू शकता.

नाहीतर तर भविष्यात तुम्हाला जुन्या वेदना पुन्हा जाणवतात, मूड स्विंग्स होतात, पायांना सूज येते. त्यामुळे तुम्हाला जमेल तितकं तुमच्या शरीराचा अंदाज घेऊन चालणं फायद्याचं ठरेल.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT