Sakshi Sunil Jadhav
आत्तापर्यंत प्रत्येक व्यक्ती कितीतरी पेट्रोल पंपावर गेला असेल. पण त्यांना तिथे मिळणार मोफत सुविधांबाबत अजुनही माहिती नाहीये.
सरकारी नियमांनुसार काही सुविधा पेट्रोल पंपाने प्रत्येक ग्राहकांना देणं गरजेचं आहे. याबाबत पुढील माहितीत आपण जाणून घेणार आहोत.
प्रत्येक पेट्रोल पंपावर वाहनांच्या टायरमध्ये हवा भरण्यासाठी मशीन लागतेच. त्यासाठी ग्राहकांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.
पंपावर येणाऱ्या ग्राहकांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणं अनिवार्य आहे. वॉटर कूलर किंवा आरओ सिस्टम उपलब्ध असणे आवश्यक आहे.
महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र व स्वच्छ शौचालय असणं आवश्यक आहे. याचा लाभ ग्राहक मोफत घेऊ शकतात.
आपत्कालीन परिस्थितीत वापरासाठी पेट्रोल पंपावर फर्स्ट एड बॉक्स ठेवणं गरजेचं आहे. यामध्ये बँडेज, अँटीसेप्टिक आणि प्राथमिक औषधं असतात.
आग लागल्यावर लगेचच उपाय करता यावा यासाठी फायर एक्स्टिंग्विशर आणि इतर सुरक्षा उपकरणं पंपावर असणे महत्वाचं आहे.
ग्राहकांच्या इंधनात कोणती भेसळ आहे का किंवा प्रमाण कमी आहे का हे तपासण्याचा अधिकार आहे. फिल्टर पेपर आणि ५ लिटर जारच्या मदतीने ही तपासणी फ्रीमध्ये करता येते.
NEXT: जेवणासाठी काहीतरी झटपट आणि पौष्टीक खायचंय? बनवा गरमागरम गव्हाची खिचडी, वाचा रेसिपी