Postpartum Bleeding saam tv
लाईफस्टाईल

Postpartum Bleeding : प्रसूतीनंतर किती दिवस रक्तस्राव होतो? रंग बदलला तर काय आहे धोका? लगेच डॉक्टरांकडे जा

Postpartum Bleeding : बाळाच्या जन्मानंतर पहिलेला रक्तस्रावही होतो. याला वैद्यकीय भाषेत लोचिया असं म्हटलं जातं. मात्र ही परिस्थिती कधी धोकादायक ठरते ते पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

बाळ पोटात असताना तसंच प्रसूतीनंतर महिलांच्या शरीरात अनेक मोठे बदल होत असतात. बाळाच्या जन्मानंतर पहिलेला रक्तस्रावही होतो. याला वैद्यकीय भाषेत लोचिया असं म्हटलं जातं. ही परिस्थिती उद्भवणं एक सामान्य परिस्थिती आहे. मात्र प्रसूतीनंतर किती दिवस हा रक्तस्राव होतो याची माहिती प्रत्येक महिलेला असणं गरजेचं आहे.

प्रसूतीनंतर किती दिवस रक्तस्राव होऊ शकतो?

तज्ज्ञांच्या सांगण्यांनुसार, प्रसूतीनंतर सामान्यपणे ४-६ आठवड्यापर्यंत रक्तस्राव होऊ शकतो. यावेळी प्रसूतीनंतर पहिल्यांदा काही दिवस रक्तस्रावाचं प्रमाण जास्त असतं, त्यानंतर ते कमी होतं.

मुंबईच्या फोर्टीस रूग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. संगीता रावदेव म्हणाल्या, प्रसूतीनंतर रक्तस्त्राव होणे ही एक सामान्य घटना असून त्याला 'लोचिया' असं म्हटलं जातं. ज्यामध्ये रक्त, एंडोमेट्रियल टिश्यू आणि श्लेष्मा यांचा समावेश असतो. हे प्रसूतीनंतरच्या 6 आठवड्यांपर्यंत टप्प्याटप्प्याने होतं असतं.

कसा असतो स्रावाचा रंग

यामध्ये पहिल्या 3 ते 4 दिवसांत स्रावाचा रंग गडद लाल रक्त असतो. त्यानंतर पुढील 15 दिवसांत, त्याचा रंग बदलून ते गुलाबी-तपकिरी रंगात रूपांतरीत होतो. त्याचप्रमाणे यावेळी प्रवाहातही बदल होऊन स्रवाचा प्रवाह मध्यम असतो. यानंतर, डिस्चार्ज अजून कमी होऊन पिवळसर-पांढरा रंगाचा होऊ लागतो, असंही डॉ. संगीता यांनी माहिती दिलीये.

या स्रावादरम्यान संसर्गाचा धोका?

डॉ. संगीता पुढे म्हणतात, जर लोचियाला म्हणजेच येणाऱ्या स्रावाला दुर्गंधी येत असेल किंवा त्याचा रंग हिरवा असेल, तर ते संसर्ग झाल्याचा संकेत असू शकतो. यावेळी तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

किती प्रमाणात रक्तस्राव होणं ठरू शकतं धोकादायक?

तज्ज्ञांच्या म्हणण्यांनुसार, सामान्यपणे ४-५ आठवडे म्हणजे एक महिना प्रसूतीनंतर रक्तस्राव होऊ शकतो. मात्र जर ६ आठवड्यानंतरही रक्तस्राव थांबत नसेल तर हे चिंतेचं कारण बनू शकतं. त्यावेळी अशी परिस्थिती उद्भवल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

काय केलं पाहिजे?

प्रसूतीनंतर जर महिलांना अधिक प्रमाणात रक्तस्राव होत असेल आणि प्रत्येक तासाला पॅड बदलावं लागत असेल तरीही तातडीने डॉक्टरांना सल्ला घ्यावा. याशिवाय स्रावादरम्यान रक्ताच्या गाठी दिसून आल्या तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. जर तुम्हाला या काळात अचानक ताप आला तर हे इन्फेक्शनचं लक्षणं असू शकतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Mushroom Masala: अवघ्या काही मिनिटात तयार करा झणझणीत आणि चवदार मशरूम मसाला

ड्रम निळ्या रंगाचाच का असतो?

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT