Stress Management Saam tv
लाईफस्टाईल

Stress Management : सतत ताण घेण्याची सवय पडू शकते महागात? कसे कराल यावर मात?

Stress Disease : अति तणावामुळे आपल्या आरोग्याच्या अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते. ज्यामुळे आपल्याला जीवही गमवावा लागू शकते. अशावेळी अधिक ताण घेतल्यामुळे कोणत्या आजाराला बळी पडू शकता तसेच यावर मात कशी कराल जाणून घेऊया.

कोमल दामुद्रे

How To Manage Stress :

बदलेल्या जीवनशैलीनुसार आपल्या मानसिकतेवर खूप परिणाम होतो. रोजच्या कामामुळे ताण येतोच पण त्यामुळे झोप न लागणे, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि वाढता स्क्रीन टाइममुळे आपण तणावाला बळी पडत आहोत.

अति तणावामुळे आपल्याला आरोग्याच्या अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते. ज्यामुळे जीवही गमवावा लागू शकते. अशावेळी अधिक ताण घेतल्यामुळे कोणत्या आजाराला बळी पडू शकता तसेच यावर मात कशी कराल जाणून घेऊया. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तणावामुळे होणारे आजार

1. हृदयरोग

तणावामुळे (Stress) हृदयाच्या संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. तणावामुळे उच्च रक्तदाब होऊ शकतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येऊ शकतो. तणावामुळे झोप न लागण्याची अनेक कारणे देखील समोर आली आहेत.

2. मधुमेह

जास्त ताण घेतल्यामुळे स्ट्रेस हार्मोन्स तयार होऊ लागतात. त्यामुळे न्सुलिन प्रतिरोधक क्षमता वाढते. इन्सुलिन योग्यप्रकारे काम न करत असल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते. रक्तातील साखर कमी झाल्यास मधुमेह (Diabetes) होऊ शकतो.

3. स्ट्रोक

तणाव वाढल्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवते. ज्यामुळे रक्त गोठणे आणि शिरा फुटण्याचा धोका वाढू शकतो. या दोन्ही कारणांमुळे स्ट्रोकचा धोका निर्माण होतो.

तणावावर मात कशी कराल?

1. शारीरिक क्रियाकलाप

शारीरिक हालचाली केल्याने तणाव कमी होतो. ज्यामुळे आनंदी संप्रेरक, एंडोर्फिन सोडते. ज्यामुळे आपला मूड सुधारण्यास मदत करते. त्यासाठी दररोज काही वेळ चाला किंवा व्यायाम करा

2. निरोगी आहार

आपल्या आहारात भाज्या, फळे, दही, दूध आणि कडधान्याचा समावेश करा. यामुळे तुमचे आरोग्य सुधारेल. ज्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होईल.

3. मेडिटेशन करा

दररोज थोडा वेळ मेडिटेशन करा. ज्यामुळे तणाव कमी करता येईल. त्यासाठी दिवसातून किमान ३० मिनिटे ध्यान करा.

4. स्क्रीन वेळ कमी करा

जास्त स्क्रीन टाइममुळे तुम्ही तणावाचे बळी पडू शकता. सोशल मीडियाचा अतिवापर केल्याने डोळ्यांसोबत मेंदूवर ताण येतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anger damages Heart: तणावापेक्षा धोकादायक राग! केवळ ८ मिनिटांचा राग वाढवतोय हार्ट अटॅकचा धोका

Maharashtra Live News Update: आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरूवात

Filmmaker Death : प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचं निधन, घरात कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, बॉलिवूडवर शोककळा

ज्येष्ठ खासदाराचे दुर्दैवी निधन, फुटबॉल खेळताना मैदानातच कोसळले, देशावर शोककळा!

Todays Horoscope: आज या राशींनी ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT