Exam Tips For Parents 
लाईफस्टाईल

Exam Tips For Parents: मुलांच्या परीक्षेमध्ये पालकांची भूमिकाही महत्त्वाची, कशी कराल मदत? 'या' चुका करणं टाळाच!

Parenting Tips: नुकत्याच बोर्डाच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. प्रत्येक घरात आता परीक्षेचे वातावरण असते. मुलं त्यांचं ठरलेले वेळापत्रक पाळत असतात. अशात मुलांना पालकांकडून पुरेपुर साथ मिळणं खूप महत्वाचं आहे.

Saam Tv

नुकत्याच बोर्डाच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. प्रत्येक घरात आता परीक्षेचे वातावरण असते. मुलं त्यांचं ठरलेले वेळापत्रक पाळत असतात. अशात मुलांना पालकांकडून पुरेपुर साथ मिळणं खूप महत्वाचं आहे. पालकांनी त्यांना योग्य वेळी खाण्यापिण्यासाठी, तसेच आरामासाठी आणि महत्वाचं म्हणजे अभ्यासासाठी जास्त वेळ दिला तर मुलं हमखास परीक्षेत उत्तीर्ण होतात. चला तर जाणून घेऊ पालकांनी परीक्षेच्या वेळी कोणत्या गोष्टींची महत्वपुर्ण काळजी घेतली पाहिजे.

परीक्षाच्या तयारीसाठी मुलांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तयार करणं हे पालकांचं काम आहे. परीक्षाच्या तयारीसाठी पालकांनी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्यांची संपुर्ण यादी पुढील प्रमाणे आहे.

मुलांचं रुटीन

मुलांचं रुटीन कसं असावं याची काळजी घ्यावी. त्यात मुलांना त्यांच्या सोयीनुसार वेळापत्रक करायला लावा. मग त्यांना योग्य मार्गदर्शन द्या. यात त्यांच्या झोपेबद्दल विशेष काळजी घ्या.

मुलांना परिक्षेसाठी मानसिकदृष्ट्या तयार करा.

मुलांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तयार करावं. बऱ्याच वेळेस मुलं परीक्षेचे टेंशन घेतात. त्यामुळे त्यांचे लक्ष विचलित होऊ शकते. त्यावेळेस पालकांची साथ त्यांना असणे फार फायदेशीर ठरू शकते.

परिक्षेची मदत

मुलांना परीक्षेच्या तयारीसाठी प्रोत्साहित करावं. मुलांना परीक्षेच्या तयारीसाठी हवी असलेली मदत द्यावी. मुलांना परीक्षेच्या तयारीसाठी हवी असलेली माहिती द्यावी. मुलांना परीक्षेच्या तयारीसाठी हवे असलेली मार्गदर्शनं द्यावी. त्याने मुलं परीक्षेसाठी खूप चांगल्या पद्धतीने तयार होतात.

अभ्यासाचे नियोजन

मुलांना परीक्षेच्या तयारीसाठी हवी असलेली प्रेरणा द्यावी. तसेच परीक्षेसाठी कोणत्या विषयाचा अभ्यास कितीदा करावा? हे पाहणे गरजेचे आहे. तसेच कोणता विषय त्यांना कठीण वाटत असेल तर पालकांनी त्यांना हवी असलेली संपुर्ण मदत करावी. त्याने मुलांचा ताण कमी होतो. तसेच मुलांना त्यांच्या कामात कमी लेखणे सोडले पाहिजे. अन्यथा त्यांचा कॉन्फीड्ंस लो होतो. तर परिक्षेला जाताना त्यांनी सर्व कागदपत्रे व्यवस्थित घेऊन जावे याची तपासणी पालकांनी केली पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बारामतीत बड्या उद्योजकावर भीषण हल्ला! शहरात खळबळ

Maharashtra News Live Update: मुंबईत गॅंगवॉर खपवूनन घेतला जाणार नाही- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

त्याने आमचं ऐकलं नाही; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर 'अनिल' नावाची पोस्ट व्हायरल

Tiger Shroff Firing Video: दोन सेकंदात ५ राउंड; अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर

टायगर श्रॉफवर ५ राऊंड फायर, गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; बॉलीवूड हादरलं | VIDEO

SCROLL FOR NEXT