Holi 2024  saam tv
लाईफस्टाईल

Holi 2024 : होळीला नवी नवरी माहेरी का जाते? काय आहे कारण?

Holi Festival News : लग्नानंतरची पहिली होळी प्रत्येक तरुणीसाठी खास असते. तरुणीने बालपणी ज्यांच्यासोबत होळी खेळली. मात्र, लग्न झाल्यामुळे कुटुंबापासून दूर गेलेली असते. त्यात लग्न झाल्यानंतर नवी नवरी पहिल्या होळीला माहेरी जाते.

Vishal Gangurde

Holi Festival 2024 :

लग्नानंतरची पहिली होळी प्रत्येक तरुणीसाठी खास असते. तरुणीने बालपणी ज्यांच्यासोबत होळी खेळली. मात्र, लग्न झाल्यामुळे कुटुंबापासून दूर गेलेली असते. त्यात लग्न झाल्यानंतर नवी नवरी पहिल्या होळीला माहेरी जाते. तिचा नवरा देखील होळी खेळायला सासरी येतो. नवरी पहिली होळी सासू-सासऱ्यांसोबत का साजरी करत नाही, जाणून घेऊयात. (Latest Marathi News)

नवी नवरी सासरी होळी साजरी का करत नाही?

पौराणिक कथानुसार, फाल्गुन पोर्णिमेच्या दिनी होलिका मातेचा विवाह हा इलोजीसोबत होणार होता. पण लग्नाच्या दिवशी ती प्रल्हादाला घेऊन चितेवर बसली. तर दुसरीकडे सायंकाळी वरात तिच्या घरी आली, तेव्हा होलिका माता चितेवर जळत होती. त्यावेळी होलिका मातेला चितेवर जळताना पाहून तिच्या होणाऱ्या सासू-सासऱ्याला धक्का बसला. त्यानंतर होणाऱ्या सासूचा मृत्यू झाला. तेव्हापासून नवी नवरी पहिली होळी साजरी करण्यासाठी माहेरी जाते.

...तर नवरा-बायकोमध्ये दुरावा येतो?

धार्मिक मान्यतेनुसार, नवी नवरीने पहिली होळी सासूसोबत साजरी केली तर त्यांच्या नात्यात दुरावा येतो. नव्या नवरीने माहेरी पहिली होळी साजरी केल्याने विवाहित जोडप्यात गोडवा निर्माण होतो. यामुळे दोन्ही कुटुंबाचं नातं मजबूत होतं.

पूर्णिमा तिथी आणि शुभ मुहूर्त

होलिका दहन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी होळी साजरी केली जाते. यंदा फाल्गुनी पौर्णिमा तिथी २४ मार्चला सकाळी ९.५४ वाजता सुरु होईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी २५ मार्चला दुपारी १२.२९ वाजता संपेल. त्यामुळे २४ मार्चला होलिका दहन आहे.

होलिका दहनाचा शुभ मुहूर्त हा ११:१३ ते १२:२७ पर्यंत असणार आहे. होलिका दहनासाठी एकूण १ तास १४ मिनिटे वेळ मिळणार आहे. होळीच्या दुसऱ्या धुलीवंदन साजरी केली जाते. त्यामुळे यावर्षी २५ मार्चला धुलीवंदन साजरे करण्यात येईल. त्या दिवशी देशभरात रंगाची उधळण केली जाईल.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sidharth Malhotra Father Passes Away: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, सिद्धार्थ मल्होत्राला पितृशोक

Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी पडझड; काय आहे दिवसाअखेरचा दर?

मोठी बातमी! मुस्लीम समाजाचं ५ टक्के आरक्षण रद्द, अचानक नेमकं काय घडलं? VIDEO

रशिया-पाकिस्तानमध्ये 'यारीदोस्ती'; भारताच्या संरक्षण सज्जतेपुढे आव्हान, VIDEO

Gram Panchayat Elections: दिवाळीत उडणार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बार? मतदानाबाबत नवी अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT