Shraddha Thik
हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व आहे. याला रंगांचा सण म्हणूनही ओळखले जाते. चला जाणून घेऊया होळीला पांढऱ्या रंगाचे कपडे का घालतात?
दरवर्षी फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला होळी साजरी केली जाते. यावर्षी होलिका दहन 24 मार्चला होणार असून 25 मार्चला होळी साजरी होणार आहे.
फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाची पौर्णिमा 24 मार्च रोजी सकाळी 09:54 वाजता सुरु होईल. ही तारीख 25 मार्च रोजी दुपारी 12:29 वाजता संपेल.
होळीच्या दिवशी पांढरे कपडे घातलेले लोक तुम्ही अनेकदा पाहिले असतील. या रंगाचे स्वतःचे महत्त्व आहे.
होळी हा सण बंधुभावाचे प्रतिक मानला जातो. या दिवशी पांढरे कपडे परिधान केल्याने शांती आणि सकारात्मकता प्राप्त होते. होळीच्या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते.
होळी हा वाईटावर चांगल्याच्या विजयाचा सण मानला जातो. या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करणे हे सत्याचे प्रतीक मानले जाते.
होळीबरोबरच उन्हाळाही सुरु होतो. या काळात पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केल्यास उष्णता कमी होते. यामुळे व्यक्तीला आरामदायी वाटते.