Holi 2024, Holi 2024 Puja Date Saam Tv
लाईफस्टाईल

Holi 2024 : होळीला भद्राचं सावट! होलिका दहन करण्यासाठी शुभ मुहूर्त कधी?

Holi 2024 Puja Date : फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला होळीचा सण साजरा केला जातो. यंदा हा सण २४ मार्चला साजरा करण्यात येईल.

कोमल दामुद्रे

Holi 2024 Puja, Muhurt :

फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला होळीचा सण (holi festival) साजरा केला जातो. यंदा हा सण २४ मार्चला साजरा करण्यात येईल. हा सण फाल्गुन महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरा केला जातो म्हणून याला फाल्गुनोत्सव असे म्हणतात.

होलिका दहन चंद्रग्रहणासोबतच भद्रा नक्षत्र असणार आहे. वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो. हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. हा सण उत्तर भारतामध्ये (India) उत्साहाने साजरा (Celebrate) केला जातो. याला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. यंदा होळीला भद्रा नक्षत्राचे सावट असल्यामुळे शुभ मुहूर्त हा २ तासांचा असणार आहे.

1. होलिका दहन तारीख आणि वेळ

  • पौर्णिमा तिथी २४ मार्च २०२४ - सकाळी ०९.५४ पासून सुरु होणार आहे.

  • पौर्णिमा तिथी २५ मार्च २०२४ रोजी दुपारी १२.२९ वाजता संपेल.

धार्मिक मान्यतेनुसार भद्रकाल शुभ मानला जात नाही. या काळात पूजा आणि शुभ कार्य करता येणार नाही. पंचांगानुसार २४ मार्च रोजी सकाळी ०९.५४ वाजल्यापासून भद्रा सुरु होईल तर रात्री ११.१३ वाजता संपेल. २४ मार्च २०२४ रोजी ११.१४ ते १२. २० पर्यंत होलिका दहनाचा शुभ मुहूर्त आहे.

2. भद्राच सावट

पंचागानुसार २४ मार्च रोजी भद्रा नक्षत्राचे सावट ०६.३३ ते ०७.५३ पर्यंत राहिल तर त्यानंतर सायंकाळी ०७. ५३ ते १०.०६ पर्यंत सावट राहिल.

3. होलिका पूजनाचा मंत्र

  • ओम होलिकाय नम:

  • ओम प्रल्हादाय नम:

  • ओम नृसिंहाय नम:

होलिका दहन करताना या मंत्राचा जप केल्याने मनातील नकारात्मकता, वाईच विचार दूर होतात. तसेच सुख-समृद्धी नांदेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : परतवाडा-चिखलदरा मार्गावर पर्यटकांच्या वाहनांची प्रचंड वाहतूक कोंडी

Thane Crime News : भिवंडीतील १६ वर्षीय तरुणीचा रौद्र अवतार; अपहरणाचा डाव उधळला, रिक्षाचालकावर करकटकने हल्ला

Crime News : हॉटेलमध्ये जाऊन सोबत पिले दारू; बाहेर निघताना झाला वाद, नशेतच चाकूने हल्ला करत केली हत्या

GK: सीमेवर वसलेलं 'हे' आहे भारतातील अंतिम रेल्वे स्थानक

Early symptoms of pancreatic cancer : स्वादुपिंडाचा कॅन्सर होत असताना शरीरात होतात 'हे' बदल; दुर्लक्ष करणं जीवावर बेतेल

SCROLL FOR NEXT