High Cholesterol Saam Tv
लाईफस्टाईल

High Cholesterol : तरुण वयात शरीर देत आहे हे सिग्नल, तुम्हाला देखील उच्च कोलेस्ट्रॉलचा धोका नाही ना ?

5 Signs Of High Cholesterol : २५ ते ३५ वयोगटातील अनेक तरुणांमध्ये कोलेस्ट्रॉलची लक्षणे अधिक प्रमाणात दिसली आहे.

कोमल दामुद्रे

Symptoms Of High Cholesterol Levels : बदलेली जीवनशैली व खाण्यापिण्याच्या गोष्टींमुळे सध्याच्या काळात हृदयविकार, मेंदूच्या समस्या, मधुमेह, कोलेस्ट्रॉलचा आजार हा सतत वाढत आहे. वाढत्या कोलेस्ट्रॉलमुळे तरुणवर्ग चिंतेत आहे.

कोलेस्ट्रॉलचे (Cholesterol) वाढते प्रमाण तरुणांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. त्यातच २५ ते ३५ वयोगटातील अनेक तरुणांमध्ये कोलेस्ट्रॉलची लक्षणे (Symptoms) अधिक प्रमाणात दिसली आहे. त्यासाठी सर्तक राहण्याचा सल्ला दिला आहे. तरुणांमध्ये उच्च कोलेस्ट्रॉलची लक्षणे कोणती असतात हे जाणून घेऊया.

तरुणांमध्ये कोलेस्टेरॉल वाढण्याची लक्षणे

1. पायात मुंग्या येणे

जर कमी वयात हाता-पायांना मुंग्या येत असतील किंवा चालल्यानंतर मुंग्या चावल्यासारखे वाटत असेल तर ते कोलेस्ट्रॉलचे लक्षण असू शकते. जेव्हा ऑक्सिजनयुक्त रक्त अवयवांपर्यंत पोहोचत नाही तेव्हा असे होते.

2. अस्वस्थता आणि घाम येणे

एखाद्या व्यक्तीला चालताना किंवा बसल्या जागी अस्वस्थता आणि घाम येत असेल तर कोलेस्ट्रॉल वाढण्याची लक्षणे असू शकतात. जेव्हा हृदयापर्यंत (Heart) रक्त पुरेशा प्रमाणात पोहोचत नाही तेव्हा ते कमी रक्त पंप करु लागते. तेव्हा अस्वस्थता, घाम येणे यासारख्या परिस्थिती उद्भवू शकतात.

3. डोळ्यांच्या वर पिवळे डाग

जर एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यांच्या वर पिवळे ठिपके किंवा डाग दिसत असतील तर हे देखील कोलेस्ट्रॉल वाढण्याचे लक्षण असू शकते. रक्तातील किंवा शरीरातील चरबीचे प्रमाण वाढते तेव्हा अशी लक्षणे दिसून येतात.

4. शरीर दुखणे

जेव्हा एखाद्या व्यक्तीचे शरीर जड होत असेल. मान, जबडा, पोट आणि पाठदुखी जाणवते, तेव्हा ते वाढत्या कोलेस्टेरॉलचे लक्षण असू शकते.

5. लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

वाढत्या कोलेस्ट्रॉलची लक्षणे किरकोळ समजून लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु यामुळे व्यक्तीला आणखी अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यासाठी वेळीच उपचार करा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सप्तशृंगी गडावरून परतताना भीषण अपघात; दुचाकीला प्रवासी वाहनाची जोरदार धडक, तरुणाचा जागीच मृत्यू

पंतप्रधान मोदींच्या फोटोवर जादूटोणा? मोदींच्या फोटोजवळ हळद-कुंकू, लिंबू आणि नारळ; घटनेने खळबळ

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या नाशिक दौऱ्यावर

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग

जळगावात शिंदे गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याचा शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT