High Cholesterol Saam Tv
लाईफस्टाईल

High Cholesterol : हाय कोलेस्ट्रॉलचा डोळ्यांवर होतो परिणाम, या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

Cholesterol Control : अयोग्य लाईफस्टाईल जसे हायफॅट डाइट, स्मोकिंग करणे, दारू पिणे आणि एक्सरसाइज टाळणे अशा कारणांमुळे हाय कोलेस्ट्रॉलची समस्या वाढत जाते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Cholesterol Control Tips : अयोग्य लाईफस्टाईल जसे हायफॅट डाइट, स्मोकिंग करणे, दारू पिणे आणि एक्सरसाइज टाळणे अशा कारणांमुळे हाय कोलेस्ट्रॉलची समस्या वाढत जाते. अशा प्रकारच्या सवयी तुमच्या हृदय स्वास्थ्यासाठी अतिशय गंभीर मांनल्या जातात. आज आम्ही तुम्हाला या बातमीपत्रातून हाय कोलेस्ट्रॉलमुळे डोळ्यांवर होणाऱ्या गंभीर प्रभावाबद्दल माहिती सांगणार आहोत.

कोलेस्ट्रॉल हे आपल्या शरीरामध्ये बनणारे एक वॅक्स सारखे पदार्थ (Food) असते. कोलेस्ट्रॉल दोन प्रकारचे असतात, पहिले म्हणजे चांगले कोलेस्ट्रॉल आणि दुसरे म्हणजे वाईट कोलेस्ट्रॉल. वाईट कोलेस्ट्रॉल हे तुमच्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक मानले जाते. आर्टरीजमध्ये कोलेस्ट्रॉल जमा झाल्याने ते आकडू लागते आणि हार्ट अटॅक (Attack), स्ट्रोक त्यांचा प्रादुर्भाव वाढत जातो.

शरीरामध्ये प्राकृतिक रूपाने बनलेला कोलेस्ट्रॉलला गंभीर मानले जात नाही. परंतु चांगल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त झाल्याने तुम्हाला वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागू शकते. शुगर आणि सेच्युरेटेड फॅटमुळे सुद्धा शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढत जाते.

हाय कोलेस्ट्रॉलमुळे तुमच्या डोळ्यांवर होणारा प्रभाव ?

1. जैंथीलास्मा -

हे हाय कोलेस्ट्रॉलचे सर्वात सामान्य लक्षण मानले जाते. या कारणामुळे डोळे आणि नाकाच्या आसपास असलेली जागा पिवळी पडू लागते. याचा तुमच्या दृष्टीवर कोणताही वाईट परिणाम होत नाही. या गोष्टीचा सामना जास्त करून अशा व्यक्तींना करावा लागतो ज्यांना डायबिटीज आणि हाय ब्लड प्रेशर, लठ्ठपणा या सगळ्या समस्या आहेत.

या समस्येला डोळ्यांना भोवती कोलेस्ट्रॉल जमा होणे सुद्धा म्हटले जाते. हे कोलेस्ट्रॉल डोळ्यांच्या पापण्यावरती आणि डोळ्यांच्या खालील बाजूस पाहायला मिळते. डोळ्यांजवळ एका सोबत अनेक कोलेस्ट्रॉलचे दाणे पाहायला मिळतात.

2. आर्कस सेनिलिस -

आर्कस सेनिलिस ही एका अशा प्रकारची स्थिती आहे ज्यामध्ये तुमच्या डोळ्यांच्या कॉर्नयाच्या चारी बाजूस निळ्या किंवा भुरकट रंगाचा एक रंगीन छल्ला विकसित होतो. हे कॉर्नियामध्ये कोलेस्ट्रॉलच्या जमावामुळे होते आणि मुख्य रूपामध्ये मध्यम वयाच्या व्यक्तींमध्ये पाहायला मिळते.

3. रेटिनल वेन ऑक्यूजन -

हा एक अशा प्रकारचा आजार आहे ज्याचा डायरेक्ट तुमच्या कोलेस्ट्रॉलशी संबंध असतो. हा आजार बऱ्याचदा ग्लूकोमा, ब्लड प्रेशर आणि ब्लड डीसऑर्डरसोबत होत असतो. या आजारामुळे रेटीनलपर्यंत जाणाऱ्या रक्तवाहििका ब्लॉक होतात. रेटीनल हा एक लाईट सेन्सिटिव्ह उत्तक आहे जो तुमच्या डोळ्यांच्या मागे स्थित असतो. ज्याला रेटीना धमणी आणि रेटिना नसच्या माध्यमातून रक्त मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime : महाराष्ट्राच्या लेकीची भोपाळमध्ये हत्या; प्रियकराने कुटुंबाच्या मदतीने रचला क्रूर कट; लोखंडी पेटीतून बाहेर आलं संतापजनक वास्तव

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवनेरीवर दाखल

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आठव्या वेतन आयोगात बेसिक सॅलरी १८,००० रुपयांवरुन ५८,८०० होणार

Liver Problems: लिव्हरला पूर्णपणे पोखरतात हेपेटाइटिस B आणि C; पाहा व्हायरस शरीरात गेल्यावर पहिल्यांदा काय बदल दिसतात?

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी! ८६ लाख अर्ज बाद; ₹१५०० कायमचे बंद; तुमचंही नाव आहे का?

SCROLL FOR NEXT