Summer Health Advice google
लाईफस्टाईल

High Blood Pressure: रोजच्या या ४ चुकांमुळे वाढतो BP; वेळीच व्हा सावध, डॉक्टरांनी सांगितली महत्वाची माहिती

Summer Health Advice: उन्हाळ्यात वाढणारा रक्तदाब टाळण्यासाठी योग्य सवयी आवश्यक आहेत. नाश्ता टाळणे, पाणी कमी पिणे, चुकीची औषधे घेणे यामुळे बीपी वाढू शकतो. जाणून घ्या तज्ज्ञांचे महत्त्वाचे सल्ले.

Sakshi Sunil Jadhav

रक्तदाब तुमच्या रोजच्या चुकांमुळे वाढतो

रक्तदाबाच्या रुग्णांनी आहारात बदल करणं गरजेचं

रक्तदाबाच्या रुग्णांनी पुढील ४ सवयीं आत्ताच सोडा

उन्हाळा वाढलाय म्हणून आपल्याला सतत तहान लागते. ही आपल्या शरीराची गरज असते. तसेच काही गंभीर आजार झाल्यावर आपल्या शरीराला काही चांगल्या सवयींची गरज असते. सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आपण चांगल्या सवयी फॉलोच करत नाही. उशीरा जेवतो, कामानिमित्त बराचवेळ बाहेर असतो, मग बाहेरचं खावं लागतं. झोप पूर्ण होत नाही. यासगळ्याचा परिणाम तुमच्या रक्तवाहिन्यांवर होत असतो. त्याकडे जर दुर्लक्ष केलं तर तुम्हाला कमी वयात काही हार्ट संबंधीत काही जीवघेण्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

तज्ज्ञांच्या मते, जेव्हा तुम्ही एखाद्या आजाराशी लढत असता, तेव्हा तुम्हाला त्यावर औषधांबरोबर काही सवयींकडे लक्ष देणं गरजेचं असतं. त्यातला एक गंभीर आजार म्हणजे वाढता रक्तदाब (High Blood Pressure). जेव्हा याची पातळी खूप वाढते किंवा खूप कमी होते तेव्हा तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

तुम्ही BP चे रुग्ण असाल तर सकाळचा नाश्ता अजिबात टाळू नका. याने तुमच्या शरीरातली साखरेची पातळी नियंत्रणात राहते आणि ताण निर्माण करणारे हार्मोन्स कमी होतात. तसेच या रुग्णांना इतर कोणत्याही समस्या म्हणजे डोकेदुखी, ताप, सर्दी अशा आजारांवर तज्ज्ञांच्या सल्लाशिवाय कोणतीही पेनकिलर घेऊ नका. याचा थेट परिणाम तुमच्या किडनीवर होत असतो. ज्यामुळे शरीरात सोडियम आणि द्रव साठतो आणि तुमचा रक्तदाब वाढतो.

तसेच कामाच्या गडबडीत अनेकजण लघवी दाबून ठेवतात. मात्र ही सवयही आरोग्यासाठी घातक आहे. याने तुमच्या मूत्राशय आणि किडनीवर ताण येतो आणि रक्ताभिसरणावर परिणाम होऊन रक्तदाब वाढू शकतो.

पुरेसे पाणी न पिणं ही आणखी एक सामान्य वाटणारी चूक आहे. शरीरात पाण्याची कमतरता झाल्यामुळे रक्त घट्ट होतं आणि हृदयाला जास्त मेहनत घ्यावी लागते. यामुळे रक्तदाब वाढण्याची शक्यता वाढते. त्यामुळे दिवसभरात नियमित अंतराने पाणी पिणे आवश्यक आहे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LSG vs KKR: सुपर ओव्हरमध्ये कोलकाताचा शानदार विजय; रिंकू सिंहने पालटलं संघाचं नशीब, लखनौचा सलग पाचवा पराभव

PM Kisan Scheme: शेतकऱ्यांना मिळणार ९ हजार रुपये; PM किसानचा हप्ता वाढणार,पंतप्रधान मोदींची घोषणा

MSRTC: एसटी महामंडळात कोट्यवधींचा 'ग्रॅज्युटी घोटाळा'? ६३ बड्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

Maharashtra News Live Update: वनरक्षकावर हल्ला केल्यानंतर तासाभरात वाघिणीचा मृत्यू

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना सरकारचा दणका; बोगस लाभार्थ्यांकडून 11 कोटींची वसुली

SCROLL FOR NEXT