young heart disease google
लाईफस्टाईल

Heart Attack: दररोज ५ किमी धावणाऱ्या ३७ वर्षीय तरुणाला २ हार्ट स्टेंट्स; हार्ट अटॅकचं 'हे' लक्षण वेळीच ओळखा

Young Heart Risk: दररोज धावणारा फिट दिसणारा तरुणही हार्ट अटॅकला बळी पडू शकतो. लपलेला कोलेस्ट्रॉल ताणतणाव अपुरी झोप यामुळे धोका वाढतो. वेळेवर लक्षणे ओळखा तपासणी करा डॉक्टरांचा सल्ला घ्या हृदय आरोग्य जपा आजच.

Sakshi Sunil Jadhav

सध्या अनेकांना बदलत्या लाइफस्टाइलप्रमाणे फीट राहायला आवडत आहे. ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. यामध्ये तरुण मंडळी जंक फूड कमी खातात किंवा टाळतात. तसेच रोजच्या रोज व्यायाम करतात. अनेकजण महागड्या जीम लावतात आणि सोबत पर्सनल ट्रेनरही ठेवतात. शिवाय मद्यपान किंवा कोणतंही व्यसन करत नाहीत. मग यांना हार्ट अटॅकचा धोका कसा निर्माण होतो? हा अनेकांचा प्रश्न आहे.

नुकतीच तज्ज्ञांनी एक घटना सांगितली, त्यामध्ये हैदराबादमधील एका ३७ वर्षाच्या तरुणाची ही माहिती आहे. हा मुलगा दररोज सकाळी ५ किलोमीटर धावायचा, मग व्यायाम, धूम्रपान आणि मद्यपानापासून दूर राहायचा, वेळेवर झोप घ्यायचा. एक दिवशी त्याला अचानक छातीत दुखायला लागलं आणि डाव्या हातात जडपणा जाणवला. मग तो रुग्णालयात आला. तपासणीनंतर त्याला हृदयात दोन मोठे ब्लॉकेज असल्याचं समोर आलं आणि तातडीने दोन हार्ट स्टेंट्स बसवावे लागले.

अत्यंत धक्कादायक अशी ही केस असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं. पण याचं कारण समजून घेणं खूप महत्वाचं आहे. विशेषत: घरात तरुण पुरुष मंडळी असतील तर या गोष्टी लक्षात ठेवाच. डॉक्टर म्हणतात, चांगलं डाएट, व्यायाम, निर्व्यसनी असूनही हार्ट अटॅकचा धोका निर्माण होत असेल तर यामागे काही महत्वाची कारणं असतात.

त्यामध्ये जनुकीय, वांशिक , शरीरातला लपलेला कोलेस्ट्रॉल, सततचा तणाव, शरीरातला काही भाग सुजणं आणि अपुरी झोप ही प्रमुख कारणे असतात. तसेच लिपोप्रोटीन (a) नावाचा धोकादायक कोलेस्ट्रॉल प्रकार नेहमीच्या तपासणीत आढळत नाही, पण तो थेट तुमच्या नसांमध्ये अडथळा निर्माण करु शकतो. कॉर्पोरेट जीवनशैलीतील मानसिक ताण, रात्री उशिरापर्यंत स्क्रीनचा वापर आणि सात तासांपेक्षा कमी झोप यामुळेही हृदयावर गंभीर परिणाम होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

Gautami Patil : गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात बोल्ड अन् ग्लॅमरस अंदाज, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'कडक'

SCROLL FOR NEXT