High Blood Sugar: रक्तातली साखर वाढली? मग पायांचीही घ्या विशेष काळजी, अन्यथा...

Sakshi Sunil Jadhav

हाय ब्लड शुगर

रक्तातली साखर (High Blood Sugar) जेव्हा वाढते. तेव्हा रक्ताभिसरण कमी होतं आणि नसा कमजोर होतात. यामुळे पायांवर जखमा, संसर्ग आणि वेदना होण्याचा धोका वाढतो. अशावेळी रोजची पायांची योग्य काळजी घेणं महत्वाचं असतं.

High Blood Sugar Foot Care

पाय स्वच्छ ठेवा

कोमट पाण्याने आणि साबणाने पाय स्वच्छ धुवा. बोटांमधील जागा नीट कोरडी ठेवा, नाहीतर बुरशी आणि संसर्ग होऊ शकतो.

Foot Problems in Diabetes

पायांची तपासणी करा

पायावर सूज, लालसरपणा, फोड, भेगा किंवा नवीन जखम दिसत असेल तर दुर्लक्ष करू नका. लहान जखमाही मोठा त्रास देतात.

Blood Sugar Health Tips

पायाची बोटे सुरक्षित ठेवा

टाच किंवा तळव्याला मॉइश्चरायझर लावा, पण बोटांमध्ये क्रीम लावू नका. तिथे ओलावा राहिल्याने बुरशी वाढू शकते.

Diabetes Foot Care Tips

नखं काळजीपूर्वक कापा

नखे सरळ कापा आणि खूप खोल कापू नका. डोळ्यांची कमजोरी किंवा नसांचे त्रास असल्यास तज्ज्ञांची मदत घ्या.

Diabetes Foot Care Tips

हलक्या चपला

मऊ, कुशन असलेले आणि पायाला योग्य मापाचे बूट वापरा. घट्ट किंवा कडक चप्पल-बूट टाळा.

Foot Problems in Diabetes

मऊ मोजे वापरा

दररोज स्वच्छ, मऊ मोजे घाला. यामुळे घर्षण कमी होतं आणि पाय सुरक्षित राहतात.

Foot Problems in Diabetes

सुन्नपणा दुर्लक्षित करू नका

पाय दुखणं, सुन्नपणा जाणवणं, रंग बदल किंवा जखम बरी न होणे ही धोक्याची लक्षणे असू शकतात.

Foot Problems in Diabetes

टीप

पायांशी संबंधित कोणताही त्रास जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. लवकर उपचार केल्यास मोठ्या गुंतागुंती टाळता येतात.

Foot Problems in Diabetes

NEXT: Budget 2026: अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींना लॉटरी, नवी योजना सुरु

She Mart India | canva
येथे क्लिक करा