Sakshi Sunil Jadhav
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी महिलांसाठी सगळ्यात मोठी घोषणा आणि योजना आणली आहे.
आता ज्या महिलांना उद्योग किंवा व्यवसाय सुरु करायचा आहे. त्यांना SHE Mart या नव्या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
SHE Mart योजनेत महिलांना आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.
फक्त आर्थिक मदतच नाही, तर व्यवसाय नियोजन, प्रशिक्षण, मार्केटिंग आणि स्ट्रक्चरल सपोर्टही या योजनेत दिला जाणार आहे.
बचत गट आणि महिला उद्योजिकांनी तयार केलेल्या उत्पादनांना विक्रीसाठी मोठ्या बाजारपेठेशी जोडण्याचे काम सी-मार्ट करणार आहे.
SHE Mart योजनेच्या निर्णयामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील बचत गटांशी जोडलेल्या महिलांना आणि वैयक्तिक उद्योजिकांना व्यवसायात स्थैर्य मिळणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
लहान उद्योगांना चालना देण्यासाठी सरकारने MSME क्षेत्रासाठी 10 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. बंद पडलेले उद्योग पुन्हा सुरू करण्यावर भर देण्यात आला आहे.
आत्मनिर्भर भारत अभियानासाठी 2 हजार कोटी, तर जुने औद्योगिक क्षेत्र आणि लघुउद्योगांसाठी 7 हजार कोटींचा निधी जाहीर करण्यात आला आहे.