Fashion tips ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

उंच दिसण्यासाठी वापरून पाहा काही फॅशन टिप्स

या टिप्सचा फॉलो करुन दिसू शकतो आपण उंच.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आपल्याकडे अधिक प्रकारचे व अनेक रंगाचे कपडे असतात परंतु, आपल्या उंचीमुळे आपल्याला फॅशन कशी करावी हे समजत नाही.

हे देखील पहा-

फॅशनसोबतच (Fashion) त्यांना त्यांच्या उंचीचे देखील भान राखावे लागते. उंची न वाढण्यामागे अनेक कारणे असतात पण त्याचे जितके फायदे असतात तितकेच नुकसानही. कमी उंचीमुळे बऱ्याचदा आपला आत्मविश्वास कमी होतो अशावेळी आपण या फॅशन टिप्सचा (Tips) वापर करुन आपला गमावलेला आत्मविश्वास कमाऊ शकतो. या काही फॅशन ट्रिक्सच्या मदतीने आपण सहज उंच दिसू शकतो.

१. हिलवाले फुटवेअर निवडताना विशेष दक्षता घ्यायला हवी. लांब ड्रेससोबत घालण्यासाठी आपण कोणत्याही रंगाचा हायहील बॅलेरीना वा सँडलची निवड करू शकतो. ज्यात आपले पाय दिसत असतील असे फुटवेअर निवडू नका. त्यामुळे आपली उंची कमी दिसेल. स्वत:साठी स्किन कलरची हायहील चप्पल निवडल्यास आपण उंच दिसू.

२. आपली उंची कमी असेल, तर स्कर्टची निवड करताना स्कर्टची लांबी व फिटिंगकडे जास्त लक्ष द्या. खूप लांब वा घेरेदार स्कर्टमध्ये आपली उंची कमी वाटेल. गुडघ्यापर्यंत लांबीचा स्कर्ट आपल्याला अधिक शोभून दिसेल. मिनीस्कर्ट स्टॉकिंगसोबत आपण घालू शकतो. लांब स्कर्ट घालायचा असेल, तर त्याची लांबी टाचांपेक्षा खाली असावी किंवा स्कर्ट घेरदार असेल, तर त्यासोबत सैल टॉपऐवजी फिटेड टॉप वापरा.

३. खूप जास्त मोठी हँडबॅग वापरल्यास आपली उंची कमी दिसेल. उंची कमी असेल, तर नेहमी छोटी हँडबॅग निवडा. उंच दिसण्यासाठी छोटी हँडबॅग वा स्लिंग ग्रॅ निवडा. यामुळे आपण स्टायलिश आणि उंच दिसू.

४. आपली उंची कमी असेल, तर लांब केसांमुळे आपली उंची अधिक कमी दिसेल. उंच दिसण्यासाठी आपले केस छोटे ठेवा. आपले केस मानेच्या वर असतील तर आपण उंच दिसू. आपल्याला बॉब कट, शार्ट स्टेप कट इ. छान दिसतील. जर आपण आपले केस कापू इच्छित नसाल, तर ते मोकळे सोडण्याऐवजी बांधून ठेवावेत.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

३-४ महिन्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील, गणेश नाईकांच्या विधानाचा नेमका अर्थ काय?

Smartphone Tips : मोबाईल अपडेट केल्यानंतरही रीस्टार्ट का करावे? जाणून घ्या महत्त्वाचे फायदे

Gold Silver Purity : तुम्ही खरेदी केलेलं सोनं खरे की बनावट? घरच्या घरी 'या' सोप्या ट्रिकने मिनिटात करा चेक

कपडे ठेवताना तुम्हीही करताय का 'ही' मोठी चूक? कपाट खराब होण्याआधी आजच जाणून घ्या सोप्या टिप्स

SCROLL FOR NEXT