Constipation Problem Saam Tv
लाईफस्टाईल

Constipation Problem : बद्धकोष्ठतेवर रामबाण आहेत 'हे' 5 घरगुती उपाय !

Constipation Remedies : बद्धकोष्ठतेचा त्रास हार्मोनल बदल आणि पचनक्रियेच्या समस्येमुळे उद्भवतो.

कोमल दामुद्रे

Constipation Problem : बद्धकोष्ठता ही एक सामान्य समस्या आहे. बद्धकोष्ठतेचा त्रास हार्मोनल बदल आणि पचनक्रियेच्या समस्येमुळे उद्भवतो. तसेच अन्नपदार्थांमध्ये फायबरची कमतरता, कमी पाणी पिणे आणि कोणत्याही प्रकारची शारीरिक हालचाल न करणे.

या गंभीर समस्येकडे बरेच लोक दुर्लक्ष करतात. त्यामुळे वेळेवर उपचार न घेतल्यास दीर्घकालीन बद्धकोष्ठतेमुळे मुळव्याध आणि आतड्या संबंधित आजार होऊ शकतो. यामुळे गंभीर आजार टाळण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय करून बद्धकोष्ठतेवर आराम मिळवू शकतो.

1. आवळा रस

आवळ्याचा रस प्यायल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. त्यासोबत इतर आरोग्यासंबंधित समस्याही दूर होतात. त्यामुळे रोज सकाळी रिकाम्या पोटी 30 मिली आवळ्याचा रस एक ग्लास पाण्यात (Water) मिसळून प्यायल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. परिणामी बद्धकोष्ठतेचा त्रास हळूहळू कमी होतो.

2. दूध+तूप

तुपामध्ये असलेले ब्युटीरिक ऍसिड आतड्यामधील चयापचाय सुधारण्यास मदत करते. त्यामुळे बद्धकोष्ठतेवर आराम मिळतो. म्हणून रात्री झोपताना एक कप कोमट दुधात (Milk) एक चमचा तूप मिसळून नियमितपणे सेवन केल्यास बद्धकोष्ठतेच्या समस्या दूर होतील.

3. पुरेसे पाणी प्या

बद्धकोष्ठता टाळण्यासाठी पुरेसे पाणी पिणे गरजेचे असते. त्यामुळे शरीराला आवश्यक पुरेसे पाणी गरजेचे आहे. पाण्याव्यतिरिक्त इतर द्रवपदार्थ देखील बद्धकोष्ठता सुधारण्यास मदत करतात. बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी तुमच्या आहारात (Food) फायबरयुक्त अन्नपदार्थ आणि पुरेसे पाणी हा सर्वात सोपा घरगुती उपाय आहे.

4. हिरव्या पालेभाज्या

तुमच्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करून तुम्ही बद्धकोष्ठतेच्या समस्या दूर करू शकता. पालेभाज्यांमध्ये पालक, ब्रुसेल्स स्प्राउट्स, ब्रोकेली यांसारख्या फायबरयुक्त भाज्यांचा समावेश तुमच्या आहारात करा. पालकमध्ये असलेले फोलेट व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के हे पोषकघटक आतड्यांच्या कार्याला चालना देते.

5. दही / फ्लेक्ससीड पावडर

दहीमध्ये बिफीडोबॅक्टेरियम आणि लॅक्टिस नावाचे प्रोबायोटिक असते. दहीत असलेले हे गुणधर्म पचनसंस्थेला दुरुस्त करण्यास मदत करते. त्यामुळे तुम्ही जेवणासोबत दही खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. फ्लेक्ससीड बद्दल सांगायचे तर, फ्लेक्ससीड पावडरमध्ये असलेले फायबर पाण्यात विरघळते त्यामुळे मल सहज पास होते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blouse Matching Sarees: दिवाळीच्या शॉपिंगमध्ये महिलांनी 'हे' ब्लाउज विकत घेतलेच पाहिजेत

Election Commission Inquiry: महाविकास आघाडीच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाकडून चौकशीचे आदेश|VIDEO

Aadhaar Card: आधार कार्डमध्ये ही माहिती फक्त एकदाच बदलता येते; अपडेट करताना या गोष्टी लक्षात ठेवाच

Maharashtra Live News Update : निलेश घायवळचा जामीन रद्द करावा, पुणे पोलिसांची न्यायालयाला विनंती

Khans of Bollywood: तीन खान एकत्र! आमिर गाणं गात होता, पण सलमान-शाहरूखनं थांबवलं अन् असं काही केलं की...; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT