Heart Attack : हल्ली वातावरणात प्रदूषण असंख्य प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम दिसून येत आहे. तरुणांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढताना दिसत आहे ज्याचे सर्वात मोठे कारण बदलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी व प्रदूषण आहे.
प्रदुषणामुळे (Pollution) आपल्याला फुफ्फुसाच्या अनेक समस्या निर्माण होतात. पण तुम्हाला माहित आहे का की हे केवळ फुफ्फुसासाठीच नाही तर आपल्या हृदयासाठीही खूप धोकादायक आहे. स्मॉगमुळे आपल्या हृदयाच्या आरोग्यालाही अनेक धोके निर्माण होऊ शकतात. (Latest Marathi News)
हवेचे प्रदूषण हृदयासाठी धोकादायक
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी माहितीनुसार, वायू प्रदूषणाच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्याने हृदयविकाराचा झटका आणि इतर हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. जेव्हा आपण खराब हवेच्या गुणवत्तेत श्वास घेतो तेव्हा हवेतील प्रदूषण आपल्या फुफ्फुसात आणि हृदयापर्यंत रक्तप्रवाहात खोलवर जाऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला हृदयाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
असा होतो परिणाम
जेव्हा हवेतील प्रदूषक घटक आपल्या शरीरात प्रवेश करतात तेव्हा रक्त मुक्तपणे वाहून जाण्यास अधिक कठीण होते. यामुळे, रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याची शक्यता जास्त असते. आम्ही तुम्हाला सांगतो की, आपला रक्तदाब वाढू लागतो कारण हृदय शरीराच्या इतर भागांमध्ये रक्त जलद पंप करते. यामुळे हृदयावर परिणाम होऊ शकते. इतकेच नाही तर ज्या लोकांना आधीपासून हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांनाही हृदयविकाराचा झटका (Heart attack) येऊ शकतो.
स्वतःचे संरक्षण कसे कराल ?
यासाठी संतुलित आहार निवडणे आपल्या शरीरातील वायू प्रदूषणामुळे होणारे नुकसान हाताळण्यासाठी उपयुक्त आहे. संतुलित आहारामध्ये भरपूर आवश्यक जीवनसत्त्वे आणि पोषक घटक असतात. हे आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते. याशिवाय तुमच्या जीवनशैलीत नियमित व्यायामाचाही समावेश करावा.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.