Heart Attack in Winter
Heart Attack in Winter Saam Tv
लाईफस्टाईल

Heart Attack in Winter : हिवाळ्यात का वाढते हार्ट अटॅकचे प्रमाण? जाणून घ्या, कारण

कोमल दामुद्रे

Heart Attack in Winter : हल्ली हृदयविकाराचे प्रमाण अधिक प्रमाणात वाढत. बॉलिवूडसोबतच सर्वसामान्यांना देखील याचा विळखा बसला आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर हृदयाला रक्तपुरवठा पुरेसा मिळत नाही, त्यामुळे हृदयाच्या धमन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे होते.

रक्तवाहिन्यांमध्ये फॅट्स किंवा प्लेक जमा झाल्यामुळे रक्तवाहिन्या ब्लॉक होतात. जेव्हा हा प्लेक फुटतो तेव्हा रक्ताची गुठळी तयार होते, ज्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका (Heart-attack) येतो.

1. थंड हवामानाचा हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो का?

थंडीच्या मोसमात तापमानात घट झाल्यामुळे हृदयाच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो. थंड वातावरणात शरीराला उबदार ठेवण्यासाठी हृदयाला अधिक मेहनत करावी लागते. रक्ताच्या सतत पंपिंगमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात.

2. थंड हवामानामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो का?

असे मानले जाते की, हिवाळ्यात हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढते. कारण या हंगामात लोक कमी काम करतात. यादरम्यान थंड वातावरणात पक्षाघात, हृदयविकार, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या, अतालता यांसारखे विकार वाढतात.

हिवाळ्यात शरीराची मज्जासंस्था अधिक सक्रिय होते, ज्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्याला 'व्हॅसोकॉन्स्ट्रक्शन' म्हणतात. यामध्ये रक्तदाबाची पातळी वाढू लागते आणि हृदयाला रक्त पंप करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते. ज्यामुळे रक्तवाहिन्यांचे नुकसान होते.

हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका कसा टाळायचा?

  • हिवाळा जवळ आला की हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी अधिक खबरदारी घ्यावी लागते. या गोष्टी लक्षात ठेवा

  • थंडीच्या महिन्यात शरीराला उबदार ठेवणे हा हृदयाचे रक्षण करण्याचा एक उत्तम उपाय आहे.

  • जर तुमची शारीरिक हालचाल जास्त असेल तर त्यादरम्यान ब्रेक घ्या.

  • भरपूर पाणी (Water) प्या, त्यामुळे शरीर हायड्रेट राहते. डिहायड्रेशन हृदयाचे ठोके वाढवण्याचे काम करते.

  • हृदयविकाराच्या लक्षणांवर लक्ष ठेवा आणि वेळोवेळी हृदयाच्या आरोग्याची तपासणी करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs GT: हैदराबाद - गुजरात सामना रद्द होणार! समोर आली मोठी अपडेट

Rajgurunagar Rain News | पुण्यातल्या राजगुरूनगरमध्ये जोरदार पाऊस, आंब्याला फटका

Today's Marathi News Live : लोकसभेतील उमेदवारांना पाठिंबा देण्यावरून मराठा क्रांती मोर्चामध्ये दोन गट

Ghatkopar Hoarding Collapse: कारमध्ये पेट्रोल भरायला गेले अन् जीव गमावून बसले; मुंबईतील दाम्पत्याची हृदयद्रावक कहाणी

Pandharpur News : विठुरायाला ८ लाखाचा सोन्याचा हार; हैद्राबाद येथील महिला भाविकाकडून अर्पण

SCROLL FOR NEXT