High Cholesterol Saam Tv
लाईफस्टाईल

High Cholesterol Level: उच्च कोलेस्ट्रॉलमुळे वाढतो हृदयविकाराचा धोका, मग आहारात करा बदल

Manasvi Choudhary

High Cholesterol : बर्गर आणि पिझ्झा यासांरखे पदार्थ खायला सर्वांनाच आवडतात. मात्र हे पदार्थ खाणे टाळले पाहिजे. या पदार्थामुळे आरोग्यावर (Health) दुष्परिणाम होतात. जंक फूडचे जास्त सेवन केल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल वाढतो. कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्याने हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते.

रक्तातील कोलेस्ट्रॉल लेव्हल (Cholesterol) वाढल्याने अनेक गंभीर आजार उद्भवतात. कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे हृदयविकाराचा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल लेव्हल नियंत्रित ठेवण्यासाठी दैंनदिन आहारात बदल करणे अत्यंत महत्वाचे आहे.

आवळा

आवळामध्ये व्हिटॅमिन सी, मिनरल्स आणि अमिनो अॅसिड हे गुणधर्म असतात. जे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात.

ग्रीन टी

ग्रीन टीमध्ये पॉलिफेनॉल असते. पॉलीफेनॉल शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करते.

लिंबू

लिंबूमध्ये असणारे व्हिटॅमिन सी आहे जे उच्च रक्तदाब कमी करते आणि हृदयाशी संबंधित रोगांचा धोका कमी करते.

पालक

पालक या भाजीमध्ये कॅरोटीनॉइड्स नावाचे मिनरल्स आढळतात, जे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्याचे काम करतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Governemnt Job: अन्न आणि औषध प्रशासनात नोकरीची सुवर्णसंधी; महिना १,१२,००० रुपये पगार; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंचा डबल धमाका, महायुतीला 'दे धक्का',भाजप- राष्ट्रवादीचे २ बडे नेते शिवबंधन बांधणार; आज मातोश्रीवर पक्षप्रवेश

Viral Video: ना रोमान्स, ना कपल डान्स; दिल्ली मेट्रोत आता कुटाकुटी, viral video

Maharashtra Politics : गुहाटीवरून परतलेल्या ठाकरेंच्या शिल्लेदाराच्या मतदारसंघात काय घडतंय? वंचित'चं ठरलं, महायुतीत रस्सीखेच सुरूच

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT