vitamin d tablets  canva
लाईफस्टाईल

Vitamin D: व्हिटॅमिन डी कमी आहे? गोळ्या घेताय, तर थांबा, हे नैसर्गिक उपाय वाचा

Vitamin d deficiency: सध्या व्हिटॅमिन डी ची कमतरता सगळ्यांनाच जाणवत आहे. ही समस्या वातावरणातल्या बदलामुळे निर्माण होते. यासाठी आपण कोणत्या औषधांचा वापर करावा की नैसर्गिक पद्धतीने म्हणजेच सूर्य किरणांचा वापर करावा असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

व्हिटॅमिन डी किती प्रमाणात शरीरात असावे?

व्हिटॅमिन डी आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. ते जर शरीरात नसेल तर आपल्याला अशक्तपणा, थकवा आणि सांधे दुखी या आजारांना सामोरे जावे लागते.वातावरणाच्या बदलामुळे देशात ७० ते ८० टक्के लोकं व्हिटॅमिन डी च्या कमतरते मुळे त्रस्त आहेत.

असा अंदाज आहे. याच कारण म्हणजे सुर्याची किरणे व्हिटॅमिन डी साठी उपयुक्त आहेत. त्याने शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता राहत नाही. तसेच डॉक्टर नेहमीच तुम्हाला सांगत असतात की, कोवळ ऊन घेतल्याने आपल्या शरीराला व्हिटॅमिन डी मिळतं.

आपलं शरीर निरोगी राहण्यासाठी आपण काय करु शकतो?

व्हिटॅमिन डी आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. संशोधकांच्या संशोधनानुसार एका व्यक्तीच्या शरीरात त्याच्या वयाच्या ७० व्या वर्षापर्यंत व्हिटॅमिन डी ५० नॅनोमोल्स \ लिटर ते १२५ नॅनोमोल्स \ लिटर याच्या मध्ये असायला हवे.

या पेक्षा कमी असल्यास आपल्या शरीरावर त्याचा परिणाम जाणवत असतो. त्यावेळेस आपण डॉक्टरांकडे गेल्यावर आपल्याला सप्लीमेंट्स देतात. मात्र फक्त गोळ्यांचा वापर केल्यावर आपल्या शरीरात व्हिटॅमिन डी कमरता पुर्ण होत नाही. याचं कारण म्हणजे आपली बदलेली जीवनशैली.

नक्की काय केल्याने व्हिटॅमिन डी शरीराला मिळेल?

बदलत्या जीवनशैलीमध्ये आपण उशिरा झोपतो आणि उशिरा उठतो. त्यामुळे आपल्याला कोवळ ऊन मिळत नाही. तसेच बरेच जण आपली कामं वर्कफ्रॉम होम करतात. अश्या लोकांना बाहेर फिरण आवडत नाही.त्यांचा सूर्य किरणांशी संपर्क येत नाही आणि व्हिटॅमिन डी त्यांच्या शरीरात कमी होत.

यासाठी रोज घराबाहेर पडून मोकळ्या वातावरणात ऊन घेण योग्य ठरेल.त्याने स्किनमधल्या कोलेस्ट्रोलला व्हिटॅमिन डी मध्ये बदलते. पुढे हे व्हिटॅमिन लिव्हर आणि किडणी द्वारे व्यवस्थापित केलं जात. असा सूर्य किरणांचा फायदा आपल्या शरीरावर होतो. आणि कोणत्याच सप्लीमेंटची गरज आपल्या शरीराला लागत नाही. पण ज्या भागात सूर्याची किरणं पोहोचत नाहीत ते लोक गोळ्या घेऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Holidays: सोमवारी बँका बंद की सुरू राहणार? वाचा आठवडाभराच्या सुट्ट्यांची यादी

Raghav Juyal : आर्यन खानच्या चित्रपटाने राघव जुयाल झाला मालामाल, ५ मजली आलिशान बंगला बांधतोय

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Jio Cheapest Recharge: मोबाईल डेटा संपतोय लवकर? जिओचे ५० रुपयांखालील डेटा प्लॅन ठरतील बेस्ट पर्याय

IND vs AUS : कोहली-रोहितची आज अग्निपरीक्षा, पर्थमध्ये पहिला वनडे, वाचा प्लेईंग ११ अन् सर्वकाही

SCROLL FOR NEXT