Burger E-COLI 
लाईफस्टाईल

Burger E-COLI: एक बर्गर करेल तुमचा घात?बर्गरमधील E-COLI जीवाणूमुळे एकाचा बळी

Burger E-COLI: बर्गर खाल्ल्याने E-COLI च्या संसर्गामुळे एका व्यक्तीला आपल्या दीव गमवावा लागलाय. E-COLI च्या संसर्गानंतर 3 ते 10 दिवसानंतर लक्षणं दिसतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहोळकर, साम प्रतिनिधी

तुम्ही बर्गर खात असाल तर सावधान.बर्गरमधील E-COLI या जीवाणूमुळे अमेरिकेच्या आरोग्य व्यवस्थेचे धाबे दणाणले आहेत. हा जीवाणू नेमका कसा आहे? त्यापासून कसं वाचावं? यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

तुम्ही जिभेचे चोचले पुरवण्यासाठी बर्गर खात असाल तर सावधान.! चटपटीत खाण्याच्या नादात तुम्ही तुमचा जीव गमावू शकता. कारण बर्गर खाल्ल्याने E-COLI च्या संसर्गामुळे विषबाधा होऊन एका व्यक्तीचा मृत्यू झालाय.. एवढंच नाही तर क्वार्टर पाउंडर हॅम्बर्गर खाल्ल्याने अमेरिकेच्या 10 राज्यातील 49 नागरिकांना E-COLI चा संसर्ग झालाय. त्यातील 10 जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे अमेरिकेची रोग प्रतिबंधक आणि नियंत्रण संस्था CDC चं टेंशन वाढलंय..मात्र हा संसर्ग नेमका कसा होतो? पाहूयात.

बर्गरमधून कसा पसरतो E-COLI?

कापून ठेवलेला कांदा आणि बीफ पॅटीजमधून E-COLI चा संसर्ग

दूषित पाण्यामुळे E-COLI चा प्रसार

अमेरिकेचं टेंशन वाढवलेला E-COLI च्या संसर्गानंतरची लक्षणं काय आहेत? पाहूयात..

E-COLI ची लक्षणं काय?

E-COLI मुळे जुलाब, पोटदुखी, उलट्या आणि अति ताप ही लक्षणं दिसतात

संसर्गानंतर 3 ते 10 दिवसानंतर लक्षणं दिसतात

E-COLI च्या संसर्गाच्या गंभीर प्रकरणात रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची गरज

E - COLI चा संसर्ग होऊ नये म्हणून विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.

काय काळजी घ्याल?

फळे आणि भाज्या धुतल्यानंतरच वापरा

स्वच्छ आणि क्लोरीनयुक्त पाणी प्या

कच्चे मांस आणि अर्धवट शिजलेलं अन्न खाऊ नका

प्लेट्स आणि कटिंग बोर्ड स्वच्छ करून ठेवा

अमेरिकेत ई कोलायचा 10 राज्यांमध्ये प्रसार झालाय.. हा संसर्ग बर्गरमधून झाल्याने अमेरिकेची आरोग्य यंत्रणा गॅसवर आहे. त्यामुळे हा संसर्ग होऊ नये यासाठी बाहेरचं खाणं टाळण्याचा आणि स्वच्छ अन्न खाण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Municipal Election Exit Poll: खान्देशातील सर्वात मोठ्या महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार?

Municipal Elections Voting Live updates: वेळेत मतदान केंद्रावर येऊनही मतदान करण्यास नकार, कोल्हापुरात तरुणींचा संताप

अहिल्यानगरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, राधाकृष्ण विखे पाटील गड राखणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर

Saam Tv Exit Poll: मालेगावमध्ये एमआयएम सर्वात मोठा पक्ष, कुणाची सत्ता येणार?

Night Habits: रात्रीच्या या 5 वाईट सवयींचा आरोग्यावर होतो परिणाम

SCROLL FOR NEXT