Headache Problem Saam TV
लाईफस्टाईल

Headache Problem: डोकं भयंकर ठणकतय? 'हे' उपाय ट्राय करा 2 मिनिटांत शांत वाटेल

Headache Relief: डोके दुखी सामान्य वाटत असलं तरी याकडे लक्ष न दिल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात.

Ruchika Jadhav

Headache Solution:

आजकाल प्रत्येक व्यक्तीला डोके दुखीची समस्या आहे. बदलती जीवनशैली, सतत लॅपटॉपवर काम करणे, आहारात बदल असल्याने अनेकांना डोकेदुखी होते. एकदा डोकं दुखू लागलं की कोणत्याही कामात मन लागत नाही. वेगाने विचार करता येत नाही. डोके दुखी सामान्य वाटत असलं तरी याकडे लक्ष न दिल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. (Latest Marathi News)

महिलांमध्ये मायग्रेनचे प्रमाण फार वाढले आहे. यामध्ये सतत आर्ध डोकं दुखतं. तसेच काही महिलांना मळमळ आणि उलट्या देखील होतात. सतत स्क्रीन समोर काम केल्याने काहींना कपाळ, डोळे दुखण्याच्या समस्या होतात. त्यामुळे आज डोके दुखी का होते आणि त्यावर काही सोपे पण झटपट आराम देणारे उपाय जाणून घेऊ.

कामाचा तणाव

काम करताना अनेकवेळा टार्गेट आणि प्रेशर असतो. अशात आपल्याला आपले 100 टक्के देऊन काम पूर्ण करावं लागतं. त्यामुळे मेंदूवर ताण येतो आणि डोके दुखी वाढू लागते.

मायग्रेन

महिलांना मायग्रेनचा जास्त त्रास होतो. मोठे आवाज, तीव्र प्रकाश यामुळे मायग्रेन होते. बऱ्याचदा ऑफिसमधील एसीमधून तुम्ही उन्हात गेल्यावर शरीराला हे वातावरण सहन होत नाही. त्यामुळे देखील मायग्रेन होते.

सायनस

सायनस डोके दुखी ही देखील गंभीर समस्या आहे. यामध्ये व्यक्ती फार आजारी पडू शकतात. कारण यात सर्दीने नाक बंद होते. तसेच घसाही दुखू लागतो. त्यामुळे व्यक्तींना सायनस डोके दुखी होते.

डॉक्टरांना त्वरित भेटा

जर तुम्हाला डोकी दुःखीची समस्या तीव्र असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका. तुम्ही तातडीने वैद्यकीय सल्ला घ्या. अनेकदा डोळ्यांची नजर कमी झाल्यावर त्याचा डोक्यावर परिणाम होतो. त्यामुळे डोळे तपासून योग्य नंबरचा चष्मा वापरा. सायनस सारखा आजार असेल तर यावर औषोधे आणि इंजेक्शन डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या.

काही खास घरगुती उपाय

  • जर तुम्हाला जास्त डोकेदुखी जाणवत असेल तर डोकं आणि मान यामध्ये मसाज करून घ्या. त्याने काही प्रमाणात डोके दुखी थांबते.

  • सर्दीने नाक चोंबले असेल तर दिवसातून किमान 2 वेळा तरी गरम पाण्याची वाफ घ्या. याने श्वास कोंडणार नाही आणि डोके दुःखी देखील होणार नाही.

  • शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ देऊ नका. कमी पाणी पिल्याने डीहायड्रेशन होते. त्यामुळे वेळोवेळी पाणी प्या. पाणी कमी पील्याने देखील डोकं दुखू शकतं.

  • जेवणाची आबाळ होऊ देऊ नका. जेवण आणि झोप वेळच्या वेळी पूर्ण होऊ द्या. झोप पूर्ण न झाल्याने डोके दुःखी आणखीन वाढते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT