Happy Holi 2024 Wishes Saam TV
लाईफस्टाईल

Happy Holi 2024 Wishes : सुंदर संदेश, कोट्स आणि व्हॉट्सअ‍ॅपसह फेसबुक स्टेटस; होळीसाठी अशा द्या शुभेच्छा

Holi Wishes Quotes : अनेक ठिकाणी तब्बल ८ दिवस होळी साजरी केली जाते. होलिका दहनच्या दिवाशी महाराष्ट्रात सर्व घरांमध्ये पुरणपोळी बनवली जाते. आता होळी साजरा करताना तुम्ही देखील तुमच्या

Ruchika Jadhav

Holi Wishes :

भारतातील हिंदू धर्मीयांच्या सणांमध्ये होळी हा एक सर्वांत मोठा सण आहे. भारतात होळी मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी केली जाते. यूपी आणि बिहार सारख्या ठिकाणी होळीला भलताच जल्लोष असतो. कोकणात देखील शिमगा या नावाने अनोखी होळी साजरी केली जाते.

शहरामध्ये विविध रंगांनी सध्या सर्व बाजारपेठा रंगल्या आहेत. लहान मुलांसाठी फुगे आणि पिचकाऱ्या तसेच विविध मिठाई बाजारात विकण्यासाठी सजल्या आहेत. अनेक ठिकाणी तब्बल ८ दिवस होळी साजरी केली जाते. होलिका दहनच्या दिवाशी महाराष्ट्रात सर्व घरांमध्ये पुरणपोळी बनवली जाते. आता होळी साजरा करताना तुम्ही देखील तुमच्या नातेवाईकांना सोशल मीडियावर शुभेच्छा देत असाल.

आजकाल प्रत्येक सण साजरा करताना सोशल मीडियावर देखील त्याच्या शुभेच्छा दिल्या जातात. व्यक्ती व्हॉट्सअॅप आणि फेसबूकला स्टेटस आणि स्टोरी ठेवतात. त्यामुळे प्रत्येकाला आपण दिलेल्या शुभेच्छा सर्वांपेक्षा वेगळ्या आणि खास असाव्यात असं वाटतं. त्यामुळे आज या बातमीतून काही खास शुभेच्छा जाणून घेऊ.

होलिका दहन करताना त्या अग्नीने तुमच्या आजूबाजूच्या सर्व वाईट गोष्टींचा नाश होवो. होलिका दहनाच्या शुभेच्छा!

या शुभ प्रसंगी, मला आशा आहे की तुमच्या जीवनात सुख शांती आणि आनंद सर्वरंगात रंगेल. होळीच्या शुभेच्छा!

पिवळा समृद्धी दर्शवतो, लाल रंग प्रेम दर्शवतो आणि हिरवा सुसंवाद दर्शवतो. या होळीत तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव होवो!

वर्षातील सर्वात जास्त आवडीचा सण; सर्वांना प्रेमाने रंगविण्यासाठी आम्ही झालोय सज्ज होळीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा

ताऱ्यांसारखी तेजस्वी, इंद्रधनुष्यासारखी रंगीबेरंगी आणि लहान मुलाच्या हास्यासारखी आनंदी अशी होळी.

हवेत रंगांची उधळण करून साजरा करू आनंद; होळीच्या आभाळभर शुभेच्छा

तुझ्या आयुष्यात माझ्या मैत्रीचे रंग मुबारक, होळीच्या शुभेच्छा!

मनाच्या अंतःकरणातील प्रेमाणे करा रंगांची उधळण; संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य रंगांनी बहरो.

रंगांशिवाय जीवन आहे निस्तेज; होळीच्या सणामुळेच समजले रंगांचे महत्त्व, त्यामुळे होळीच्या भरभरून शुभेच्छा

आनंद, मैत्री, प्रेम या सर्व रंगांबरोबर खोटे रंग दाखवू नका, सत्याने वागा.

होळीच्या शुभेच्छा देताना तुम्ही यापैकी कोणताही एक कोट शेअर करू शकता. तसेच सर्वांत कॉमन वाक्य म्हणजे बुरा ना मानो होली है देखील म्हणू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Holiday Today: पावसाची जोरदार बॅटिंग; मुंबई, ठाण्यासह 'या' ठिकाणी शाळांना सुट्टी; वाचा सविस्तर

Horoscope: घरात येईल सुख-समृद्धि; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस ठरेल लाभकारी, जाणून घ्या राशीभविष्य

Rajyog 2025: गजकेसरी आणि कलात्मक राजयोगामुळे फळफळणार 'या' राशींचं नशीब; उत्पन्नाचे नवे मार्ग होणार खुले

Crime News: ओळखपत्र,मोबाईल हिसकावला नंतर खांबाला बांधलं; ड्युटीवर निघालेल्या लष्कर जवानासोबत टोल कर्मचाऱ्यांचं संतापजनक कृत्य

Pregnancy Tips : गर्भावस्थेतील मधुमेह नियंत्रणात ठेवणे का आवश्यक आहे?

SCROLL FOR NEXT