तुम्ही देखील विशीचे झाले आहात आणि तुमचे केस हळूहळू पांढरे होत आहेत. पण हे का होतंय? याच कारण तुमच्या नेहमीच्या सवयींमध्ये आणि तुम्ही खात असलेल्या पदार्थांमध्ये दडलं आहे. वाढते वय, ताणतणाव, बदलती जीवनशैली आणि शरीरातील पोषक घटकांची कमतरता यांचा परिणाम आपल्या केसांवरही होतो. अनेकांना कमी वयातच केस पांढरे होणे, केस गळणे आणि केसांचा नैसर्गिक चमकदारपणा कमी होणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते. अशावेळी महागडे शॅम्पू, तेल किंवा हेअर ट्रीटमेंट करण्यासोबतच आपल्या रोजच्या खाण्याकडेही तितकेच लक्ष देणेही महत्त्वाचे आहे. कारण केस निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी शरीराला योग्य पोषण मिळणे गरजेचे असते. मग केसांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा?
तुमचे केस सतत गळत असतील आणि ते स्ट्रॉंग होण्यासाठी नेमीच्या खाण्यात आवळ्याचा समावेश करा. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे केसांच्या आरोग्यासाठी आवळा फायदेशीर ठरू शकतो. आवळा कच्चा खाणे किंवा त्याचा रस पिणे हा चांगला पर्याय आहे. आवळ्यासोबतच कढीपत्ता देखील उपयुक्त ठरू शकतो. कारण कढीपत्त्यामध्ये लोह, बीटा-कॅरोटीन आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. तसेच फक्त कढीपत्ता खायला आवडत नसेल तर, रोजच्या भाज्या, पोहे किंवा चटणीमध्ये कढीपत्ता वापरून खाणे फायदेशीर ठरेल. यासोबतच काळे तीळ देखील केसांसाठी फायदेशीर आहेत. कारण काळ्या तिळामध्ये लोह, तांबे आणि मॅग्नेशियम असते. हे घटक केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. कढीपत्त्यासारखंच काळे तीळ खाणे आवडत नसतील तर तुम्ही तिळाची चटणी किंवा लाडूमध्ये घालून खाऊ शकता.
याव्यतिरिक्त कंदमुळे,पालेभाज्या आणि ड्रायफ्रूट्स देखील विरळ केस दाट करण्यासाठी मदत होऊ शकते. पालेभाज्यांमध्ये पालक,शेवग्याची पाने तर ड्रायफ्रुट्समध्ये बदाम आणि अक्रोड व्हिटॅमिन ई, चांगले फॅट्स आणि इतर पोषक घटक देतात. शेवग्याच्या पानांमध्ये लोह, झिंक आणि विविध जीवनसत्त्वे असतात. शेवग्याच्या पानांची भाजी किंवा सूप हा चांगला पर्याय आहे. त्यामुळे केस आणि टाळूचे आरोग्य टिकवण्यास मदत होऊ शकते. कंदमुळांमध्ये गाजर, बीट यांमुळे केसांना बीटा-कॅरोटीन, फोलेट आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. या भाज्या नियमित आहारात घेणे आरोग्यासाठी चांगले आहे.
केसांचा नैसर्गिक रंग मेलॅनिन या घटकामुळे ठरतो. वय, आनुवंशिकता आणि काही पोषक घटकांची कमतरता यामुळे केस लवकर पांढरे होऊ शकतात. केवळ काही पदार्थ खाल्ल्याने पांढरे झालेले केस पुन्हा काळे होतील, याची खात्री देता येत नाही. मात्र संतुलित आहार, पुरेशी झोप, ताणतणाव कमी करणे आणि केसांची योग्य काळजी घेतल्यास केसांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत होऊ शकते. कमी वयात अचानक केस पांढरे होत असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घेणेही महत्त्वाचे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.