Hair care tips, Hair falls problem  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Hair care tips : केसांची वाढ खुंटतेय? केसांना घनदाट करायचे आहे ? तर हे उपाय करुन पहा

केसांना घनदाट कसे कराल ?

कोमल दामुद्रे

मुंबई : आपल्यापैकी अनेकांना लांब केस खूप आवडतात. काहीचे केस अधिक लांब असतात पंरतु, खूप गळतात तर काहींचे लहान असतात पण वाढत नाही.

हे देखील पहा -

केस वाढवण्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो. अनेक नवनवीन उत्पादनांचा वापर करतो परंतु, केसांची घनता काही वाढत नाही. अनेक निरनिरळे उत्पादनांचा वापर केल्याने केसांची वाढ थांबते व केस गळू लागतात. आपण ऋतूमानानुसार केसांची काळजी घेत असतो. वाढत्या प्रदुषणामुळे (Pollution) जितके आपल्या शरीराला नुकसान होते तितकेच आपल्या केसांना ही होते. धूळ व हवेत असणाऱ्या केमिकल्समुळे आपल्याला केसांना हानी पोहोचते.ऋतूमानानुसार केसांची काळजी घेणे, मसालेदार पदार्थ, आंबट, खारट पदार्थ खाण्यामुळे केसांच्या अनेक समस्या उद्भवू लागतात. केसांना घनदाट करायचे आहे तर या टिप्स फॉलो करायला हव्या.

१. केसांना सफरचंदाचा व्हिनेगर लावल्यास केसांची टाळू साफ होण्यास मदत होते. यामुळे केस स्क्रब करुन त्याचे पीएच संतुलन राखले जाते. व्हिनेगर हे केसांसाठी चांगले आहे. त्यामुळे केसांची वाढ होऊन त्यांची चमक वाढते.

२. लांब केसांसाठी (Hair) कांद्याचा रस अधिक फायदेशीर ठरतो. कांद्यामध्ये असलेले घटक केस वाढवण्यास मदत करतात.

३. लांब केसांसाठी महागडी उत्पादने वापरण्याऐवजी आपण एरंडेल तेलाचा वापर करु शकतो. रिसिनोलिक ऍसिड आणि ओमेगा ६ फॅटी ऍसिड आहे. त्यामुळे टाळूवर मालिश केल्यास केसांची वाढ सुधारते.

४. आहारामध्ये भरपूर प्रथिनांचा समावेश करा. आहारात दूध-दूग्धजन्य पदार्थ, अंडी, मांस यासारख्या पदार्थांचे अधिक सेवन करा. तसेच तेल लावल्यानंतर केसांची योग्य तशी मालीश करा. असे केल्याने केस घनदाट होण्यास मदत होईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नवा व्हिडिओ! धर्मंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मोदी सरकारनं घेतला मोठा निर्णय

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! BKC ते वेस्टर्न एक्सप्रेस हायवे पर्यंत सिग्नल-मुक्त कॉरिडॉर सुरू होणार

Maharashtra News Live Update: जगप्रसिद्ध वेरूळ लेणीतील लेणी क्रमांक 29 येथील सीता न्हाणी धबधबा प्रवाहित

Shivali Parab: पिवळ्या डिझायनर साडीत खुललं शिवाली परबचं सौंदर्य; हटके ब्लाऊज डिझाइनने वेधलं लक्ष

वैभव सूर्यवंशीचा आणखी एक विक्रम; वयाच्या १५ व्या वर्षी अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच फलंदाज

SCROLL FOR NEXT