White Hair Problem Saam TV
लाईफस्टाईल

Hair Care Tips : केसांना कलर केल्यानंतर काही दिवसात पुन्हा पांढरे होतात? मेहंदीत मिसळा हा पदार्थ, महिनाभर डाय करायची गरज नकोच!

Home Remedies For White Hair: ऐन तारुण्यात केस अकाली पिकू लागले की, ते पुन्हा काळे कसे करायचे हा प्रश्न प्रत्येकाला पडतो.

कोमल दामुद्रे

Dye For White Hair :

अकाली पिकणाऱ्या केसांना पुन्हा काळे करण्यासाठी आपण अनेक प्रकारच्या गोष्टी वापरतो. ऐन तारुण्यात केस अकाली पिकू लागले की, ते पुन्हा काळे कसे करायचे हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. केस पांढरे दिसू लागले की, आपल्याला टेन्शन येते.

हल्ली पांढऱ्या केसांना काळेभोर आणि दाट करण्यासाठी आपण काही ना काही लावत असतो. अकाली पिकणाऱ्या केसांना मेहंदी हा सगळ्यात चांगला पर्याय मानला जातो. परंतु, आठवड्याभरात पुन्हा केस पांढरे होऊ लागतात. जर तुम्ही देखील केसांना कलर करत असाल स्वयंपाकघरातील हे पदार्थ मिक्स करा. महिनाभर डाय करायची गरज भासणारच नाही.

एक कप ऑरगॅनिक मेहंदीमध्ये (Mehndi) एक चमचा हळद, मोहरीचे तेल, मेथी पावडर मिसळा आणि पाण्याने (Water) पेस्ट तयार करा. ही पेस्ट मिक्स केल्यानंतर लगेच केसांना लावा.

1. मेहंदी कशाप्रकारे लावाल?

मेहंदी हा केसांना (Hair) काळे करण्यासाठी नैसर्गिक रंग समजला जातो. त्यामुळे अकाली पिकाणाऱ्या केसांवर मेंहदी रामबाण समजली जाते. याचा वापर कसा कराल जाणून घेऊया.

1. केमकिल बेस्ड मेहंदीचा वापर करु नका, यामुळे केसांना हानी पोहोचते. केसांसाठी आयुर्वेदिक मेहंदीचा वापर करा.

2. मेहंदी लावल्यानंतर आपले केस नेहमी प्लास्टिकच्या कॅपने झाकून ठेवा. केसांवर कोरडी मेहंदी लावल्याने केस तुटतात, ते झाकल्याने केस तुटणे टाळता येत नाही.

3. २ ते ३ तासांपेक्षा जास्त वेळ मेहंदी लावू नका, यापेक्षा जास्त लावल्याने केस खूप कोरडे होतील आणि तुटणे सुरू होईल.

4. मेहंदी लावण्यापूर्वी प्री कंडिशनिंग आणि शाम्पू लावा. मेहंदी लावल्यानंतर कोमट पाण्याने केस धुवा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Celebrates Ganpati 2026 : फुलांची सजावट, मोदकांचा नैवेद्य अन् ढोल ताशांचा गजर; सेलिब्रिटींच्या घरी गणरायाचे आगमन | VIDEO

IAS Officer Transfer: बदल्यांचा धडाका सुरूच! 14 आयएएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

Maharashtra News Live Update: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी विवीध बाप्पाचं पूजन

Dalimb vs Sitaphal: डाळिंब की सीताफळ? आरोग्यासाठी कोणते फळ अधिक फायदेशी, जाणून घ्या ७ फरक

Salt Intake : पुरुषांनी आणि महिलांनी दिवसाला किती मीठ खावे? जाणून घ्या योग्य प्रमाण

SCROLL FOR NEXT