Hair Care Tips  Saam Tv
लाईफस्टाईल

Hair Care Tips : केसात सतत कोंडा होतो? केसगळती वाढलीये? कापूरमध्ये मिळवा या २ गोष्टी, केसांच्या समस्या होतील दूर

Hair Falls Problem : केसगळती, केस कोरडे होणे आणि केसात कोंडा होणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. हिवाळा सुरु झाला की, कोंड्याची समस्या निर्माण होते. केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी आपण अनेक केमिकल पदार्थांचा वापर करतो.

कोमल दामुद्रे

Dandruff Problem :

केसगळती, केस कोरडे होणे आणि केसात कोंडा होणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. हिवाळा सुरु झाला की, कोंड्याची समस्या निर्माण होते. केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी आपण अनेक केमिकल पदार्थांचा वापर करतो.

केसात (Hair) कोंडा झाल्यावर केसांच्या वाढीवर त्याचा परिणाम होतो. ज्यामुळे केसांची वाढ खुंटते. तसेच आपल्या टाळूला ऍलर्जी होऊन केस गळू लागतात. जर तुमच्याही केसात कोंडा झाला असेल तर कापूरमध्ये हे २ पदार्थ मिसळून केसांना लावल्यास फायदा (Benefits) होईल.

1. हिवाळ्यात कोंड्याची समस्या का होते?

बदल्या ऋतूचा आरोग्यासोबत केसांवर अधिक परिणाम होतो. हिवाळ्यात गरम पाण्याने आंघोळ केल्यावर त्वचेपासून टाळूला अधिक नुकसान होते. त्यामुळे टाळू कोरडी पडते. तसचे टाळूवर कोंड्याची खपली तयार होतात. ज्यामुळे केसगळतीची समस्या होते.

2. कापूरमध्ये मिसळा हे पदार्थ

जर केसांमध्ये अतिरिक्त प्रमाणात कोंडा झाला असल्यास भीमसेन कापूरचा पावडर तयार करा. नंतर त्यात लिंबाचा रस घालून चांगले मिसळा. कपभर गरम खोबऱ्याच्या तेलात हे चांगले मिक्स करा. आठवड्यातून तीन वेळा केसांना लावा. शाम्पूने केस धुवा. कोंडा कमी होण्यास मदत होईल.

या तेलामुळे केसातील कोंडा कमी होईल. यात असणारे घटक बुरशीविरोधी गुणधर्म असतात. जे बुरशीच्या वाढीस प्रतिबंध करण्यास मदत करतात. याच्या नियमित वापरामुळे कोंडा, केसगळतीच्या समस्यांपासून सुटका होईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Earthquake : हाहाकार! भूकंपाच्या धक्क्याने 'हा' देश हादरला; १०,००० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू

Marathi Actress Wedding : शुभमंगल सावधान! प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, विवाह सोहळ्यातील खास VIDEO आला समोर

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

Ladki Bahin Yojana : आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय; बोगस लाडक्या बहिणींकडून पैशांची वसुली, सरकारचा जिल्हाधिकाऱ्यांना थेट आदेश

Thane Waterfall : पावसाळ्यात माथेरान, महाबळेश्वर विसरा; ठाण्यात लपलेला 'हा' धबधबा वीकेंड ट्रिपसाठी बेस्ट

SCROLL FOR NEXT