Face Wash Saam Tv
लाईफस्टाईल

वारंवार चेहरा धुण्याची सवय योग की अयोग्य? दिवसातून किती वेळा करावे Face Wash

Face Wash In A Day : उन्हाळ्याला सुरवात होणार आहे. अशा स्थितीत त्वचेची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. सूर्यप्रकाश, उष्णता आणि घाम यामुळे त्वचेवर अनेक समस्या निर्माण होतात. यामुळेच उन्हाळ्यात लोक वारंवार चेहरा धुतात.

Shraddha Thik

Face Washing :

उन्हाळ्याला सुरवात होणार आहे. अशा स्थितीत त्वचेची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. सूर्यप्रकाश, उष्णता आणि घाम यामुळे त्वचेवर (Skin) अनेक समस्या निर्माण होतात. यामुळेच उन्हाळ्यात लोक वारंवार चेहरा धुतात.

काही लोकांना दिवसातून अनेक वेळा तोंड धुण्याची सवय असते. विशेषत: उन्हाळ्यात, लोकांना असे वाटते की वारंवार तोंड धुण्याने उष्णतेपासून आराम मिळतो. चेहरा धुतल्याने चेहरा चमकतो. परंतु असे करणे कधीकधी त्वचेसाठी हानिकारक ठरू शकते. चला जाणून घेऊया दिवसातून किती वेळा चेहरा धुवावा.

दिवसातून किती वेळा चेहरा धुवावा?

सकाळी चेहरा धुवा

जेव्हा तुम्ही उठता तेव्हा प्रथम चेहरा (Face) धुवा, यामुळे आळस तर दूर होतोच पण तुमच्या शरीराला लगेच ताजेतवाने वाटते. सकाळी चेहरा धुतल्याने छिद्र साफ होतात. लक्षात ठेवा की तुम्ही तुमचा चेहरा सामान्य पाण्याने सौम्य फेसवॉशने धुवा.

दुपारी चेहरा धुवा

जर तुमच्या त्वचेचा प्रकार तेलकट असेल तर तुम्ही दुपारी सुद्धा एकदा चेहरा धुवू शकता. तेलकट त्वचा असणाऱ्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार साबण किंवा फेसवॉशचा वापर करावा. सकाळी चेहरा धुतल्यानंतर तेलकट त्वचेच्या लोकांच्या चेहऱ्यावर दुपारपर्यंत तेल जमा होऊ लागते. त्यामुळे असे लोक दुपारीही थंड पाण्याने किंवा फेसवॉशने चेहरा स्वच्छ करू शकतात.

संध्याकाळी चेहरा धुवा

जेव्हाही तुम्ही कामावरून परतता तेव्हा चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा. यामुळे दिवसभराचा थकवा दूर होतो. चेहऱ्यावर साचलेली घाणही साफ होते. काही लोक उन्हाळ्यात संध्याकाळी अंघोळही करतात. जर तुम्ही हे करू शकत नसाल तर एकदा तरी तुमचा चेहरा पूर्णपणे धुवा.

या गोष्टींमुळे त्वचा चमकते

  • जर तुम्हाला तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार बनवण्यासाठी जास्तीत जास्त पाणी पिण्याची सवय लावा. यामुळे त्वचा हायड्रेटेड आणि मॉइश्चरायझेशन राहील.

  • आपल्या आहारात दररोज एक ताज्या ज्यूसचा समावेश करण्याचे सुनिश्चित करा. यामुळे तुमची त्वचा चमकदार होईल आणि तुमचा चेहरा चमकेल. तुम्ही तुमच्या आहारात व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई समृद्ध असलेल्या गोष्टींचा समावेश करा.

  • आपल्या आहारात फळे आणि भाज्यांचे प्रमाण वाढवा. विशेषत: गाजर, काकडी, पपई, डाळिंब, कोरफड यासारख्या गोष्टींचे सेवन केल्यास चेहरा निरोगी राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack: सकाळी उठल्या उठल्या शरीरात 'हे' ६ बदल दिसल्यास दुर्लक्ष करू नका; असू शकतो हृदयविकाराचा झटका

Maharashtra Monsoon : महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट, मराठवाड्यावर सर्वात मोठं सकंट; हवामान विभागाच्या अंदाजाने धाकधूक वाढली

Monsoon Picnic Tourism: धुक्याने वेढलेले डोंगर, खळखळणारे धबधबे आणि हिरवाईचा साज पाहायचाय? मग ही TOP 10 ठिकाणं नक्की यादीत ठेवा

Pune Breaking: विषारी दारू प्रकरणात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई, २२ बड्या सरकारी अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन

Maharashtra News Live Update: पेट्रोल, डिझेल दरवाढी विरोधात काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

SCROLL FOR NEXT