ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव नेहमीच तिच्या हटके लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.
सायलीने आपल्या करिअरची सुरुवात 'काहे दिया परदेस' या मालिकेतून केली होती.
मालिकेतील शिव-गौरीची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती.
मालिकेनंतर सायली अनेक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
सायलीच्या 'झिम्मा २' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. सायलीने चित्रपटात कृतिका हे पात्र साकारले आहे.
नुकताच सायलीचा सिद्धार्थ चांदेकर आणि नाना पाटेकर यांच्यासोबतचा 'ओले आले' चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
सायली सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. तिने नुकतेच ब्लॅक कलरच्या साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत.