Gudi Padwa Wishes & Quotes Saam Tv
लाईफस्टाईल

Gudi Padwa Wishes & Quotes : नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या अशा द्या प्रियजनांना शुभेच्छा !

Gudi Padwa 2023 : मराठी लोक विशेषत: गुढीपाडव्याचा दिवस नवीन वर्षाची सुरुवात मानतात.

कोमल दामुद्रे

Gudi Padwa Messages : गुढीपाडवा हा दिवस भारतात विशेष मानला जातो. भारतातील अनेक भागांमध्ये हा दिवस नवीन वर्ष म्हणजेच नवीन वर्ष म्हणून साजरा केला जातो. मराठी लोक विशेषत: गुढीपाडव्याचा दिवस नवीन वर्षाची सुरुवात मानतात.

हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढी उभारली जाते. गुढीपाडवा म्हणजे नववर्ष आणि नववर्षाच्या (New Year) पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण 'गुढीपाडवा' म्हणून साजरा (Celebrate) करतो.

या दिवसाच्या विशेष प्रकारे शुभेच्छा दिल्या जातात. नातेवाईकांची भेट घेऊ शकत नसलो तरी व्हॉटसअॅप, फेसबुक (Facebook),शेअरचॅट,ट्विटर अशा सोशल साइट्सचा वापर करून शुभेच्छा देणे अधीक शक्य आहे, या माध्यमांद्वारे शुभेच्छा देण्यासाठी शुभेच्छा संदेश...

1. "गुढी उभारू आनंदाची,

समृद्धीची, आरोग्याची,

समाधानाची आणि उत्तुंग यशाची,

नव वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा"

2. "नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,

त्याच्यावर चांदीचा लोटा,

उभारुनी मराठी मनाची गुढी,

साजरा करूया हा गुढीपाडवा

नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा"

3. "सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,

सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..

सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा सोन्यासारख्या लोकांना..

गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा"

4. "उभारून आनंदाची गुढी दारी,

जीवनात येवो रंगात न्यारी,

पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा,

नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा"

5. "चंदनाच्या काठीवर,

शोभे सोन्याचा करा

साखरेची गाठी आणि,

कडुलिंबाचा तुरा

मंगलमय गुढी,

ल्याली भरजरी खण,

स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण

गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा"

6. "प्रसन्नतेचा साज घेऊन,

यावे नववर्ष!

आपल्या जीवनात नांदावे,

सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष!!

गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा"

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई ते पुणे प्रवास अधिक वेगवान, मुंबईहून ४८ मिनिटात पुण्यात पोचणार

Best Strike : मुंबईकरांचे हाल होणार, BEST चे हजारो कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर, या आहेत प्रमुख मागण्या

भिवंडी हादरली! चिकन शाओर्मा, पिझ्झा खाल्ल्याने १४ जणांना विषबाधा; अचानक उलट्यांचा त्रास अन्...

ट्रम्प झुकले, आखातात शांतता, इराण-अमेरिकेत 'व्हर्साय' करार, य़ुद्धबंदीच्या करारात नेमकं काय?

MLA Convoy Accident: विवाह समारंभातून परतताना आमदाराच्या ताफ्यातील वाहनांचा भीषण अपघात; ५ गाड्या एकमेकांवर आदळल्या

SCROLL FOR NEXT