Govardhan Puja 2026 Date saam tv
लाईफस्टाईल

Govardhan Puja 2026: गोवर्धन पूजा ९ की १० नोव्हेंबरला? कन्फ्यूजन दूर करा, तारीख आणि पूजेची योग्य वेळ एका क्लिकवर

Shubh Muhurat : यंदा गोवर्धन पूजा कधी साजरी होणार हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. तारखेसह याचा मुहूर्त आणि पूजा विधी पुढील माहितीत जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

दिवाळीचा सण संपल्यानंतर गोवर्धन पूजेची तयारी सुरू होते. भगवान श्रीकृष्णाला समर्पित असलेला हा सण मोठ्या श्रद्धेनं साजरा केला जातो. या दिवशी गोवर्धन पर्वताची पूजा केली जाते. तसेच भगवान श्रीकृष्णाला अन्नकूटाचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा असते. पण यंदा गोवर्धन पूजा नेकमी ९ नोव्हेंबरला आहे की १० नोव्हेंबरला, असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. त्यामुळे जाणून घेऊया गोवर्धन पूजेची तारीख, शुभ मुहूर्त, पूजेची विधी आणि या सणाचं महत्त्व.

गोवर्धन पूजा २०२६ कधी आहे?

हिंदू पंचांगानुसार, कार्तिक महिन्यातल्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला गोवर्धन पूजा केली जाते. २०२६ मध्ये प्रतिपदा तिथी ९ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजून ३१ मिनिटांनी सुरू होईल आणि १० नोव्हेंबरला दुपारी २ वाजता संपेल. उदयातिथीनुसार, यंदा गोवर्धन पूजा मंगळवार, १० नोव्हेंबर २०२६ रोजी साजरी केली जाईल.

गोवर्धन पूजा २०२६ शुभ मुहूर्त

पुजेची तारीख - १० नोव्हेंबर २०२६, मंगळवार

प्रतिपदा तिथी सुरूवात - ९नोव्हेंबर २०२६, दु. १२.३१ वाजल्यापासून

प्रतिपदा तिथी समाप्ती - १० नोव्हेंबर २०२६, दु. २ वाजता.

सकाळचा पूजा मुहूर्त - सकाळी ६.४० ते ८.५०

अभिजित मुहूर्त - सकाळी ११.४३ ते दुपारी १२.२६

गोधूली मुहूर्त - संध्याकाळी ५.३० ते ५.५६

गोवर्धन पूजा का आणि कशी केली जाते?

पौराणिक कथेनुसार, भगवान श्रीकृष्णाने ब्रजवासीयांना इंद्रदेवाऐवजी गोवर्धन पर्वताची पूजा करण्यास सांगितले होते. यामुळे रागावलेल्या इंद्रदेवाने ब्रजमध्ये मुसळधार पाऊस पाडला. तेव्हा श्रीकृष्णाने आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलून गावातील लोक आणि जनावरांचे रक्षण केले. या घटनेच्या स्मरणार्थ गोवर्धन पूजा केली जाते. ही पूजा करताना सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ कपडे घातले जातात. घराच्या अंगणात शेणापासून गोवर्धन पर्वताची प्रतिकृती तयार केली जाते. मग त्याला फुले, रोली आणि अक्षता अर्पण करून सजवतात. भगवान श्रीकृष्णाची मूर्ती किंवा फोटो ठेवून दिवा लावला जातो.मग फळं, मिठाई आणि विविध पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. शेवटी धार्मिक परंपरेनुसार गोवर्धन पर्वताला सात वेळा प्रदक्षिणा घातल्या जातात.

टीप: हे मुहूर्त दिल्लीच्या पंचांगानुसार दिले आहेत. तुमच्या शहरानुसार वेळेत बदल होऊ शकतो. धार्मिक मान्यतेनुसार, अन्नकूटाचा प्रसाद ग्रहण केल्याने घरात सुख-समृद्धी नांदते आणि अन्नधान्याची कमतरता भासत नाही, अशी श्रद्धा आहे. साम टिव्ही याची शाश्वती घेत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sprouts Benefits : रोज एक मूठभर स्प्राउट्स खाल्ल्याने काय होते? जाणून घ्या त्याचे आरोग्यदायी फायदे

Maharashtra News Live Update: पावसामुळे रत्नागिरीत उडाली भातशेतीची दाणादाण, शेतकऱ्याचं मोठं नुकसान

Water Storage : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! खडकवासलाच्या पाणीसाठ्यात वाढ; अवकाळी पावसामुळे दिलासा

Trendy Saree Designs: सण-समारंभात दिसाल सर्वांत सुंदर! पाहा पारंपरिक साड्यांचे ७ ट्रेंडी आकर्षक डिझाइन्स

Political Crisis : २५ आमदार बंडखोरीच्या तयारीत, या सरकारला दिला १४ दिवसांचा अल्टिमेटम; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT