Parenting Tips For Child Confidence  Saam Tv
लाईफस्टाईल

Child Care Tips : वाढत्या वयात मुलांचा सर्वांगीण विकास कसा कराल? पालकांनो, कशी घ्याल काळजी

Parenting Tips : मुलांची सर्वांगीण वाढ योग्यरित्या होत नसल्यास अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

कोमल दामुद्रे

Good Nutrition Develop Child Health :

वाढत्या वयात मुलांची अधिक चिंता पालकांना वाटू लागते. सर्वांगीण वाढ योग्यरित्या होत नसल्यास अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्याचा परिणाम मुलांच्या वजन आणि उंचीवर होतो. तसेच स्वभावात देखील चिडचिडेपणा येतो.

पालकांना अशी लक्षणे दिसल्यास तर मुलांची योग्यरित्या काळजी घ्यायला हवी. ज्यामुळे योग्यरित्या पोषण घेतल्यास मुलांचा सर्वागीण विकास होईल. अॅबॉटच्‍या न्यूट्रिशन व्‍यवसायाच्‍या मेडिकल अॅण्‍ड सायण्टिफिक अफेअर्सचे संचालक डॉ. गणेश काढे कुपोषणाचा एक प्रकार स्‍टण्टिंगबाबत, मुलांच्या सर्वांगीण विकासाबाबत सांगत आहे.

मुलांना योग्य प्रमाणात पोषण मिळाले नाही तर त्यांना कुपोषणाचा सामना करावा लागतो. ज्याचा त्यांच्या सर्वांगीण विकासावर परिणाम होतो. जगभरात प्रत्येक तीनपैकी एक व्यक्ती कुपोषणाने पीडित आहे. ज्यामधून आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या निर्माण होतात. सध्या जगभरात पाच वर्षांखालील जवळपास १४९ दशलक्ष मुले कुपोषणांने पीडित आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालामधून असे दिसून आले की, भारतात जगभरातील एक तृतीयांश मुले पाच वर्षांखालील ४०.६ दशलक्ष मुले कुपोषणाने पीडित आहेत.

1. मुलांची वाढ आणि विकास क्षमता कशी वाढवाल?

मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी उत्तम पोषण महत्त्वाचे आहे. शरीराला उत्तम पोषण मिळाल्यास शारीरिक आणि मानसिक विकासास आवश्यक ती पौष्टिक घटक मिळतात. ज्यामुळे मुलांची वाढ होण्यासोबत त्यांचे शिक्षण, विकास व इतर गोष्टींवर परिणाम होतो. त्यांना योग्य आणि पुरेशा प्रमाणात अन्नपदार्थ मिळाल्यास त्याच्या त्यांना फायदा होईल.

2. मुलांच्या वाढीसाठी आहारात हे पदार्थ महत्त्वाचे

1. कॅल्शियम:

शरीरात कॅल्शियमचे पुरेसे प्रमाण असले तर हाडे मजबूत राहातात. दातांचे आरोग्य उत्तम राहाते. स्नायू आकुंचन पावते, रक्ताभिसरण सुधारते. तसेच मुलांच्या आहारात दूध, दही आणि चीजचा समावेश करा. हिरव्या पालेभाज्या खाऊ घाला.

2. व्हिटॅमिन डी:

व्हिटॅमिन डी हे आपल्या सूर्यरप्रकाशातून अधिक प्रमाणात मिळते. हाडे मजबूत करण्यासोबतच मुलांमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम व्हिटॅमिन डी करते. यामध्ये फॅटी फिश, साल्मन, मॅकरेल आणि सार्डिनेसचा मुलांच्या आहारात द्या

3. झिंक:

सर्वांगीण विकासाची वाढ होण्यासाठी झिंक अधिक महत्त्वाची भूमिका बजावते. यामध्ये मसूर , चणे, नट्स, गहू आणि तांदूळ, दुग्धजन्य पदार्थांचा समावेश मुलांच्या आहारात असू द्या

4. व्हिटॅमिन ए:

मुलांची त्वचा, तोंडाचे विकार, फुफ्फुसांचे आरोग्य राखण्यासाठी व्हिटॅमिन ए सगळ्यात चांगले स्त्रोत आहे. डोळ्यांच्या उत्तम दृष्टीसाठी फायदेशीर आहे. यामध्ये संत्री, पिवळी फळे आणि भाज्याचा समावेश अधिक असतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात परतीच्या पावसाचा धुमाकूळ

Mumbai Port Authority: सफाई कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रकल्प रखडला; ‘मुंबई पोर्ट’कडून परवानगीसाठी विनंती

Ratnagiri Tourism : प्राचीन वास्तुकला अन् रेखी‍व शिल्पे, रत्नागिरीत गेल्यावर 'ही' लेणी पाहायला नक्की जा

Crime News: चहावाल्याच्या घरी सापडलं घबाड; १ कोटींची रक्कम अन् सोने,चांदी; दोन भावांचा कांड पाहून अधिकारीही चक्रावले

Bihar Election : ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याने दिला पक्षाचा राजीनामा

SCROLL FOR NEXT