WhatsApp Pay update google
लाईफस्टाईल

WhatsApp Recharge Feature: गुड न्यूज! आता WhatsApp वरूनच करता येणार मोबाइल रिचार्ज; वापरायचं कसं? या स्टेप करा फॉलो

WhatsApp Update: व्हॉट्सअॅपने भारतात नवीन फीचर सुरू केले असून आता यूजर्सना थेट अॅपमधून मोबाईल रिचार्ज करता येणार आहे. यूपीआयद्वारे सोपी पेमेंट प्रक्रिया उपलब्ध असून अनुभव अधिक जलद आणि सुलभ होणार आहे.

Sakshi Sunil Jadhav

सध्या भारतात सगळ्याच गोष्टी डिजिटल पेमेंट्सने करता येतात. स्मार्ट फोनच्या मदतीने तुम्ही १ सेंकदांत स्कॅन करुन हे पेमेंट करु शकता. तुम्ही ऑनलाइन शॉपिंग करु शकता. त्यातच WhatsApp हे सगळ्यांच्या रोजच्या वापरातले महत्वाचे App ठरले आहे. यावर फक्त चॅटींग करता येत नाही तर अनेक महत्वाची कामं सुद्धा करता येतात. त्यातच एक नवीन अपडेट समोर आली आहे. ज्यामध्ये तुम्हाला काही सोप्या स्टेप्सने मोबाईलचा रिचार्ज सुद्धा करता येणार आहे.

आता तुम्ही Reliance Jio, Airtel आणि Vodafone Idea (Vi) चे प्रीपेड रिचार्ज व्हॉट्सअॅपवर करु शकता. जे तुम्ही आतापर्यंत Paytm, Google Pay किंवा टेलिकॉम कंपन्यांच्या वेगवेगळ्या अॅपमध्ये करत होतात. पण आता हे सर्व काम एकाच WhatsApp अॅपमध्ये करता येईल. याने यूजर्सचा वेळ वाचेल आणि ही प्रोसेस सोपी असेल. हे फीचर हळूहळू सुरू करण्यात येईल.

तसेच या फीचरचा वापर करणंही सोपं आहे. WhatsApp अपडेट केल्यानंतर पेमेंट्स सेक्शनमध्ये जा. तेथे मोबाईल रिचार्ज हा पर्याय दिसेल. तिथे मोबाईल नंबर टाका. त्यानंतर उपलब्ध प्लानमधून योग्य प्लान निवडून UPIच्या मदतीने पेमेंट करता येईल. पेमेंट पूर्ण झालं की रिचार्ज लगेच कन्फर्मेशनचा मेसेज तुम्हाला येईल.

WhatsAppच्या या नव्या सुविधेमुळे डिजिटल पेमेंट्सचा फायदा होईल. आतापर्यंत रिचार्जसाठी सगळ्यात जास्त वापरलं जाणारं Paytm, PhonePe आणि Google Pay यांना आता WhatsAppकडून एक आव्हानच मिळणार आहे.

Maharashtra News Live Update: IIT पवईच्या बाहेर वंचितचा आंदोलन

राज्यातील जिल्ह्यांची संख्या वाढणार? सरकारकडून हालचालींना वेग; 7 तालुक्यांसाठी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला मंजुरी

Maharashtra Politics: काँग्रेसला मोठा हादरा, बड्या नेत्याचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

T20 Ranking: टी २० रँकिंगमध्ये भारतीय खेळाडूंचा जलवा! टॉप ५ मध्ये २ तडाखेबंद फलंदाज

Skin Care: ग्लोइंग आणि मॉइश्चराइज स्किनसाठी घरच्या घरी बनवा 'ही' नाईट क्रीम; ५ दिवसांत दिसेल फरक

SCROLL FOR NEXT