Sakshi Sunil Jadhav
Sachin Tendulkarचा जन्म 24 एप्रिल 1973 रोजी मुंबईत झाला. त्याने वयाच्या 16 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.
सचिन हा जगातील एकमेव खेळाडू आहे, ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतके करण्याचा रेकॉर्ड केला.
सचिनने 200 टेस्ट सामन्यांमध्ये 15,921 धावा केल्या आहेत. हा एक ऐतिहासिक विक्रम आहे.
463 वनडे सामन्यांमध्ये 18,426 धावा करत त्यांनी अनेक विक्रम आपल्या नावावर केले.
वनडेमध्ये पहिलं द्विशतक झळकावण्याचा मानही सचिन यालाच मिळाला आहे.
2011 साली भारताने ICC Cricket World Cup 2011 जिंकताना सचिनचा मोठा वाटा होता.
सचिन मुंबईच्या बांद्राजवळ 80 ते 100 कोटींच्या आलिशान बंगला खरेदी केला. इतकी इनवेस्टमेंट करणारा हा पहिलाच क्रिकेटर आहे.
सचिनकडे BMW i8, BMW 7 Series, Ferrari 360 Modena आणि Porsche 911 Turbo S यांसारख्या महागड्या गाड्या आहेत. त्याच्या सगळ्या कार कलेक्शनची किंमत 35 कोटींपेक्षा जास्त आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, सचिन तेंडुलकरची एकूण संपत्ती हजारो कोटी रुपयांमध्ये असल्याचं सांगितलं जात आहे.