Travel With Partner Saam Tv
लाईफस्टाईल

Travel With Partner : पार्टनरसोबत फिरायला जाताय? या ब्युटी टिप्स नक्की फॉलो करा

Couple Travel Tips : तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत स्पेशल डेटला जाण्यासाठी प्लॅनिंग केले असेलच.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Travel Tips For Couple : तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत स्पेशल डेटला जाण्यासाठी प्लॅनिंग केले असेलच. स्पेशल डेट सुंदर बनवण्यासाठी जोडीदार प्रयत्न करत असतात त्यामूळे तुम्ही त्यांच्यासाठी सरप्राईज प्लान केले असेल. त्यासोबत खास दिसणे देखील तितकेच गरजेचे आहे त्यामुळे आज आम्ही काही ब्युटी टिप्स घेऊन आलो आहोत.

तेलकट त्वचेसाठी या टिप्स फॉलो करा -

हिवाळयात त्वचेच्या समस्या अधिक जास्ती होत असतात.अशावेळी जर तुमची त्वचा (Skin) तेलकट असेल तर मुलतानी माती गुलाब जल मध्ये मिसळून पेस्ट बनवून तुमच्या चेहऱ्यावर लावून तुमच्या त्वचेचे समस्या कमी होऊ शकतात.

चेहरा जर नॉर्मल असेल तर मुलतानी मातीमध्ये दही आणि मध मिक्स करून पेस्ट बनवून घ्या. त्यानंतर ती पेस्ट चेहऱ्यावर लावा पंधरा-वीस मिनिटांनी लावलेले पेस्ट कोरडे झाल्याने पाण्याने (Water) चेहरा स्वच्छ धुऊन घ्या.

फेशियल स्क्रब वापरा -

फेशियल स्क्रब केल्याने डेड स्किन निघून जाण्यास मदत मिळते आणि चेहरा चमकदार होतो. त्यासाठी अक्रोड पावडर मध्ये एक चमचा मध आणि एक चमचा दही मिक्स करून त्याचे स्क्रब बनवून घ्या.ते स्क्रब चेहऱ्यावर लावून साधारण पंधरा मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा.

फेस पॅकचा वापर करा -

या दिवशी खास दिसण्यासाठी कढीपत्त्याचा वापर करून फेस पॅक तयार करू शकता. दोन चमचे सुकी कढीपत्ता, ओट्स दोन चमचे गुलाब जल आणि एक चमचा दही मिक्स करून पेस्ट तयार करा. हा फेसपॅक वापरताना डोळे आणि ओठ वगळून उर्वरित चेहऱ्यावर लावून ठेवा त्यानंतर 20 मिनिटांनी चेहरा धुवून घ्या.

कॉटन वूल पॅड -

कॉटन वूल पॅडचा वापर करण्यासाठी ते गुलाब जल मध्ये बुडवून फ्रीजमध्ये पंधरा मिनिटांसाठी ठेवा. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून हलक्या हाताने गालाच्या खालच्या आणि वरच्या बाजूला लावा त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर चमक येईल.

फ्रुट पॅकचा वापर करा -

एक बारीक चिरलेला सफरचंद, पपईचा लगदा,मॅश केलेल्या केळी,दही आणि लिंबाचा रस एकजीव करून त्याचे मिश्रण चेहऱ्यावर अर्ध्यातासासाठी लावून ठेवा त्यानंतर चेहरा धुऊन घ्या त्यामुळे तुमचा चेहरा चमकदार दिसण्यात मदत मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : बुलढाण्यात अपघाताचा थरार! महिला मजुरांच्या ऑटोला भरधाव कारची जोरदार धडक; ८ जण गंभीर, एका महिलेचा मृत्यू

Rohit Shetty: घराबाहेर गोळीबार झाला तेव्हा रोहित शेट्टी कुठे होता? हल्लेखोराबद्दल समोर आली महत्त्वाची माहिती

Maharashtra Live News Update: हायस्पीड कॉरिडॉरमुळे जीडीपीमध्ये मोठी वाढ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Share Market Crash: अर्थसंकल्प सादर होत असतानाच शेअर बाजार गडगडला, सेन्सेक्स 2500 अकांनी घसरला

Dhurandhar : 'धुरंधर'ची गगन भरारी; गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये एन्ट्री, अक्षय खन्नाची जादू जगभरात

SCROLL FOR NEXT